esakal | Corona Update: मराठवाड्यात कोरोनाचे नवे १३५ कोरोना रुग्ण, चार जणांचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

Marathwada Corona Update

औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या ४७ हजार २८० वर पोचली.

Corona Update: मराठवाड्यात कोरोनाचे नवे १३५ कोरोना रुग्ण, चार जणांचा मृत्यू 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाड्यात सोमवारी (ता. ८) दिवसभरात १३५ कोरोना रुग्ण आढळले. त्यात औरंगाबादेत ४३, जालना २०, लातूर २३, नांदेड १४, हिंगोली ४, परभणी ७, बीड १८, उस्मानाबाद जिल्ह्यातील ६ जणांचा समावेश आहे. दरम्यान, लातुरमध्ये दोन, जालना- नांदेडमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. 

पत्नी संजनाने मारली बाजी, माजी आमदार हर्षवर्धन जाधवांची ‘किंग मेकर’ची भूमिका फोल 

औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या ४७ हजार २८० वर पोचली. सध्या १९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या आणखी २१ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४५ हजार ८४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत १ हजार २४१ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

विवस्त्र अवस्थेतील तरुणाने वृद्धाबरोबर केलेल्या कृत्याने बसला धक्का!!  

शहरातील बाधित : गजानन कॉलनी (१), तिरूपती विहार, गारखेडा (३), एन-७ सिडको (१), जाधववाडी (१), एन-४ सिडको (२), मेहरनगर (१), नारळी बाग (१), बजाजनगर (१), सत्यमनगर (१), अन्य (१९). ग्रामीण भागातील बाधित ः नागद (१), फुलंब्री (१), सिडको महानगर (१),  अन्य (९). 

औरंगाबादच्या आणखी बातम्या वाचा

Edited - Ganesh Pitekar

loading image