Harshwardhan Jadhav Sanjana Jadhav
Harshwardhan Jadhav Sanjana Jadhav

पत्नी संजनाने मारली बाजी, माजी आमदार हर्षवर्धन जाधवांची ‘किंग मेकर’ची भूमिका फोल 

पिशोर (जि.औरंगाबाद) :  पिशोर (ता.कन्नड) ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदासाठी सोमवारी (ता.आठ)  निवडणूक प्रक्रिया पार पडली. शिवशाही ग्रामविकास पॅनलच्या सरलाताई डहाके यांची सरपंचपदी, तर संजनताई जाधव समर्थक ग्रामविकास पॅनलचे बाळासाहेब जाधव यांची उपसरपंचपदी निवड झाली.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव व त्यांच्या पत्नी संजना जाधव यांच्या एकमेकांच्या विरोधातील पॅनलमुळे चर्चेत आलेली ही निवडणूक कोणत्याही पॅनलला बहुमत नसल्याने त्रिशंकू झालेली होती. शिवशाही ग्रामविकास पॅनलचे सर्वांत जास्त सात सदस्य निवडून आले होते.

चर्चा हर्षवर्धन जाधव यांची, बाजी मारली संजनताईंची
सरपंच व उपसरपंचपदासाठी झालेल्या मतदानामुळे पुन्हा चर्चेत आली. माजी आमदार हर्षवर्धन जाधव जामिनावर सुटून बाहेर आल्याने ते चार सदस्यांच्या जोरावर किंग मेकरची भूमिका पार पाडतील असा कयास मात्र संजनाताई जाधव समर्थक ग्रामविकास पॅनलच्या केवळ दोन सदस्यांच्या जोरावर पूर्णतः फोल ठरवला. संजनताई जाधव व बाळासाहेब जाधव यांनी शिवशाही ग्रामविकास पॅनलला पाठिंबा देत सर्व मनसुबे उधळून लावले. सदस्य सविता आण्णा नवले यांना सरपंचपदासाठी पाच व उपसरपंचपदाचे उमेदवार महादू सांडू जाधव यांना पाच मते पडली. विशेष म्हणजे हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनलमधून निवडून आलेल्या व राजेंद्र मोकासे यांच्या पॅनल मधून निवडून आलेल्या सदस्यांना फोडून बहुमतापेक्षा जास्त तीन सदस्यांसोबत घेऊन पुंडलिक डहाके व संजना जाधव समर्थक उपसरपंच बाळासाहेब जाधव यांनी पिशोर ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेतली.

फुटल्याने मोठा धक्का 
सरपंच सरलाबाई ज्ञानेश्वर डहाके व उपसरपंच बाळासाहेब जाधव यांना ज्योती मोकासे, भास्कर जाधव, रईसाबी शेख, वैशाली निकम, धीरज शेजवळ, सविता मोकासे, किसन मोकासे, शरिकाबी सययद यांनी हात उंचावून पाठिंबा दिला तर सरपंचपदाच्या विरुद्ध  उमेदवार सविता नवले व उपसरपंचपदाचे उमेदवार महादू सांडू जाधव यांना कुसुमबाई नवले, सूर्यभान दहेतकर, भूषण नवले यांनी मतदान केले. राजेंद्र मोकासे यांच्या पॅनलमधून निवडून आलेल्या धीरज शेजवळ व हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनलमधून निवडून आलेले उमेदवार भास्कर जाधव, वैशाली निकम हे फुटल्याने हर्षवर्धन जाधव व राजेंद्र मोकासे यांना मोठा धक्का बसला. माजी आमदार हर्षवर्धन जाधव जामिनावर बाहेर येण्याआधी त्यांचे समर्थक सदस्य हे पुंडलीक डहाके यांच्या सोबत होते.

पण हर्षवर्धन जाधवांनी त्यांच्या सदस्याचा पाठिंबा अपक्ष सरला नवले यांना दिल्याने या निवडणुकीचे गणित बदलत गेले. निवडणुकीसाठी अध्याशी अधिकारी दिनकर जाधव, सहायक मतदान अधिकारी खाजूमियाँ पठाण यांनी काम पाहिले, तर रविंद्र निकम,किशोर पवार, पुंजाजी सपकाळ, पोलिस कर्मचारी संजय दराडे, सुधाकर पाडळे, पोलीस पाटील चित्रा पवार, भिकन शेजवळ, तुषार काकुळते, आशा सेविका तारा गाडेकर, अश्विनी दवगे, वंदना सपकाळ यांनी सहकार्य केले.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com