विवस्त्र अवस्थेतील तरुणाने वृद्धाबरोबर केलेल्या कृत्याने बसला धक्का!!  

रामदास साबळे
Monday, 8 February 2021

अचानक एक विवस्त्र अवस्थेत असलेला तरुण त्यांच्या जवळ आला. नि काहीही न बोलता

केज (जि.बीड) : तालुक्यातील कुंबेफळ येथील बाबुराव जाडकर (वय ८५) या वृद्धास विवस्त्र अवस्थेत आलेल्या तरूणाने अचानक हल्ला करत मारहाण केल्याची घटना सोमवार (ता.आठ) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या मारहाणीत त्या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती पोलिसांना समजताच त्या तरूणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पत्नी संजनाने मारली बाजी, माजी आमदार हर्षवर्धन जाधवांची ‘किंग मेकर’ची भूमिका फोल 

तालुक्यातील कुंबेफळ येथील बाबुराव जाडकर हे कुंबेफळ-सारणी (आनंदगाव) रस्त्यावरील खडी केंद्राजवळ असलेल्या शेताच्या कडेला बसलेले होते. याच सुमारास त्याठिकाणी अचानक एक विवस्त्र अवस्थेत असलेला तरुण त्यांच्या जवळ आला. नि काहीही न बोलता हल्ला करत त्याने त्या वृद्धास दगडाने डोक्यात मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या मारहाणीत त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना कळविली.

मामाचा नाद खूळा ! भाचा सैनिक झाला म्हणून दिलं 'गाव जेवण'

घटनेची माहिती समजताच युसुफवडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हल्ला करणाऱ्या तरुणास ताब्यात घेतले आहे. मात्र तो तरुण नेमका कुठला आहे? त्याने मारहाण का केली? हे अद्याप समजू शकले नाही. अद्यापही या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. तो तरूण मनोरूग्ण असल्याची प्राथमिक माहिती आहे. तालुक्यातील मागील दोन दिवसांपासून डोक्यात दगड मारून जखमी केल्याच्या भोपला व सासुरा येथे घडल्या असताना मात्र या तिसऱ्या घटनेत नाहक वृद्धाचा बळी गेला असल्याने खळबळ उडाली आहे.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Brutally Murdered Elderly Person In Kaij Beed Crime News