esakal | मराठवाड्यात आणखी २७१ कोरोनाचे रुग्ण, औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या ४७ हजार ८४२ वर
sakal

बोलून बातमी शोधा

Marathwada Corona Updates

मराठवाड्यात मंगळवारी (ता.१६) कोरोनाचे २७१ रुग्ण आढळले.

मराठवाड्यात आणखी २७१ कोरोनाचे रुग्ण, औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या ४७ हजार ८४२ वर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाड्यात मंगळवारी (ता.१६) कोरोनाचे २७१ रुग्ण आढळले. त्यात औरंगाबादेत १२०, जालना ५५, लातूर १९, बीड १९, उस्मानाबाद १२, नांदेड २१, हिंगोली १०, परभणी जिल्ह्यातील १५ जणांचा समावेश आहे. जालन्यात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला.

औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या ४७ हजार ८४२ वर पोचली आहे. बरे झालेल्या आणखी ४७ जणांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत ४६ हजार १९० रुग्ण बरे झाले आहेत. ४०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एक हजार २४५ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

शहरातील बाधित (९६) : बीड बायपास (४), हनुमाननगर (१), गजानन कॉलनी (१), एन-४ सिडको (४), सेव्हन हिल (१), टिळकनगर (१), मित्रनगर (२), सिद्धार्थनगर (१), सिडको एन- ५ (१), एन-९ (३), सातारा परिसर (५), शिवाजीनगर (२), शास्त्रीनगर (३), रमानगर (१), एन-सात (१), इंडोजर्मन टूल रूम (१), एन-१ सिडको (२), एन-२ सिडको (२), नारेगाव (१), जालाननगर (२), कांचनवाडी (४), उल्कानगरी (१), म्हाडा कॉलनी (१), इटखेडा (१), घाटी परिसर (२), गारखेडा (२), क्रांती चौक (३), जवाहर कॉलनी (१), नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलनी (१), हिमायत बाग (१), योगिराज टॉवर (१), रोशन गेट (१), मथुरानगर (१), उस्मानपुरा (३), जयभवानीनगर (१), सुंदरनगर पडेगाव (१), श्रेयनगर (१), अन्य (३१).

ग्रामीण भागातील बाधित (२४) : शेंद्रा एमआयडीसी (१), वाळूज (१), बजाजनगर (३), फुलंब्री (१), कन्नड (२), सौजन्यनगर, वाळूज (१), अन्य (१५).

Edited - Ganesh Pitekar

loading image