esakal | बसा बोंबलत! बाजार समितीच्या सचिवाची खुर्चीच नेली उचलून
sakal

बोलून बातमी शोधा

Chairperson of the Market Committee confiscates co-op

जाधववाडी येथील पंडित हरणे यांनी १० एकर जमीन बाजार समितीने १९८७ मध्ये संपादित केली याप्रकरणी पंडित हरणे यांनी शासकीय दरानुसार मोबदला मिळावा यासाठी न्यायालयात दाद मागितली होती,

बसा बोंबलत! बाजार समितीच्या सचिवाची खुर्चीच नेली उचलून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: कृषी उत्पन्न बाजार समितीने संपादित केलेल्या दहा एकर जमिनीचा वाढीव मोबदला संबंधिताला न दिल्यामुळे बाजार समितीच्या सचिव, सहसचिव यांच्या खुर्चीसह संगणक साहित्य व दोन वाहनांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. काकडे यांनी दिले. सदर आदेशाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. 

पुलाची सेंट्रिंग कोसळली, लोखंडी सळ्या पडून पाच मजूर दबले

जाधववाडी येथील पंडित हरणे यांनी १० एकर जमीन बाजार समितीने १९८७ मध्ये संपादित केली याप्रकरणी पंडित हरणे यांनी शासकीय दरानुसार मोबदला मिळावा यासाठी न्यायालयात दाद मागितली होती, त्यानुसार त्यांचा ९३ लाख ९२ हजार ९८५ रुपयांचा मोबदला परतावा प्रकरणी न्यायालयाने १० फेब्रुवारी रोजी जप्तीचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी ही कारवाई करण्यात आली विशेष म्हणजे ही कारवाई करताना सचिव, सभापती कार्यालयात उपस्थित नव्हते. 

घाटी रुग्णालयात मोठा फ्रॉड - वाचा 

या साहित्याची केली जप्ती 

या कारवाईमध्ये सचिव,सहसचिव यांच्या खुर्ची संगणक साहित्य यासह दोन चार चाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. 

सचिव,सभापती प्रचारात गुंग 

मुंबई बाजार समितीचे च्या संचालकांची निवडणूक २९ फेब्रुवारीला होणार आहे. या निवडणुकीत औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिशन पठाडे निवडणुकीत आहे आणि याच निवडणुकीसाठी ते प्रचारासाठी मराठवाड्यात या दौऱ्यावर आहेत. याच काळात हीकारवाई झाली आहे . याच प्रचारासाठी सचिवही असल्याचा आरोप काँग्रेसच्या संचालकांना तर्फे केला जात आहे. 

मराठा क्रांती मोर्चामुळे किती विकले गेले झेंडे- वाचा  

माझ्या दहा एकर जमिनीचा १९ ९३ पासून वाढीव मोबदला मिळवण्यासाठी आम्ही लढा देत आहे. माझी वडीला फर्जत दहा एकर जमीन १९८७ ला बाजार समितीने संपादित केली मात्र त्यावेळी मोबदला हा कमी प्रमाणात देण्यात आला. तो मोबदला शासकीय दराप्रमाणे मिळावा अशी मागणीसाठी आम्ही न्यायालयात गेलो होतो. आता जप्तीचे आदेश काढले आहेत. वाढीव मोबदला देण्यात यावा. 
-पंडित हरणे,शेतकरी.