esakal | विवाहित महिला बेपत्ता झाल्यावर माहेरच्या लोकांचा राग अनावर, सासरच्या लोकांना बेदम मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

crime news 1.jpg

मुलगी बेपत्ता असल्याची माहिती मिळताच माहेरकडील लोकांनी सासरकडील लोकांना बेदम मारहाण केली. हा धक्कादायक प्रकार औरंगाबाद शहरातील शिवाजीनगर परिसरात घडला. 

विवाहित महिला बेपत्ता झाल्यावर माहेरच्या लोकांचा राग अनावर, सासरच्या लोकांना बेदम मारहाण

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : विवाहिता सकाळपासून बेपत्ता झाल्याची माहिती कळताच माहेरच्या लोकांनी तिचे सासरचे घर गाठून सासरच्या मंडळींवर हल्ला चढविला. ही घटना सोमवारी (ता.२) रात्री साडेआठच्या सुमारास शिवाजीनगर भागात घडली. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर आणि जवाहरनगर ठाण्यातील पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
शिवाजीनगर परिसरात पाण्याच्या टाकीजवळ राहणारी शिवकन्या चव्हाण ही २३ वर्षीय विवाहिता सोमवारच्या सकाळपासून बेपत्ता आहे, ही माहिती तिच्या गेवराई तांडा येथील माहेरकडच्या नातेवाईकांना माहित पडताच एक टेम्पो भरून लोक शिवकन्या चव्हाण हिच्या शिवाजीनगर येथील सासरच्या घरी येऊन धडकले. आमची मुलगी कोठे आहे असा प्रश्न करत विवाहितेच्या दीर आणि त्यांच्या आईला मारहाण करण्यास सुरवात केली.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अचानक झालेल्या हल्ल्याने परिसरातील लोक मध्यस्थी करण्यासाठी आले असता त्यांना देखील धक्काबुक्की करण्यात आली. यात विवाहितेचा दीर अक्षय उत्तम चव्हाण आणि अक्षय यांची आई जखमी झाले. त्यांना पुंडलिकनगर पोलिसांनी तातडीने शहानुरमिया दर्गा परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. मुलीच्या वडीलांनी आरोप केला आहे की, त्यांच्या मुलीचा घातपात करण्यात आला. तिचा पती हा पसार झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)

loading image