chhatrapati sambhajinagar municipal corporation
sakal
छत्रपती संभाजीनगर - महापालिका निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक यश मिळविले. तब्बल ५७ नगरसेवक निवडून आल्यामुळे महापौर भाजपचाच होणार हे निश्चित आहे. पण, महापौराच्या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठीचे आरक्षण निघाल्यास भाजपकडे महापौरपदासाठी उमेदवारच नाही.