esakal | हॅकॅथॉन राष्ट्रीय स्पर्धेत एमआयटी विद्यार्थी प्रथम

बोलून बातमी शोधा

Aurangabad News MIT

स्मार्ट सिटी करता उपयुक्त होऊ शकेल असे ट्राफिक नियंत्रणचे डिजाईन केले आहे. आणि त्याचे पेटंट सुद्धा फाईल केले आहे. कोणत्या लेन ला किती ट्राफिक असेल त्यानुसार ट्राफिक सिग्नलचे नियोजन करता येऊ शकेल. भविष्यात कोणत्या भागात ट्रॅफिक नियमांचे जास्त उल्लंघन होऊ शकते आणि परिणामी काय समस्या उद्भवू शकतात, याचे अंदाज हे डिजाईन सांगू शकेल.

हॅकॅथॉन राष्ट्रीय स्पर्धेत एमआयटी विद्यार्थी प्रथम
sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : पुणे येथे आयोजित राष्ट्रीयस्तरावरील युरेका हॅकॅथॉन ३.० स्पर्धेत एमआयटीतील संगणक अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी प्रथम पारितोषिक आणि चाळीस हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळविले. प्रा. डॉ आरती मोहनपूरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ही स्पर्धा रायसोनी इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आयोजित केली होती.

युरेका हॅकॅथॉन ३.० स्पर्धेत हर्ष परदेशी, अंकित विश्वकर्मा, विशाल सांगळे आणि स्वप्नील पट्टेकर यांनी सहभाग नोंदवला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी माहिती दिली कि, त्यांनी स्मार्ट सिटी करता उपयुक्त होऊ शकेल असे ट्राफिक नियंत्रणचे डिजाईन केले आहे. आणि त्याचे पेटंट सुद्धा फाईल केले आहे. कोणत्या लेन ला किती ट्राफिक असेल त्यानुसार ट्राफिक सिग्नलचे नियोजन करता येऊ शकेल. भविष्यात कोणत्या भागात ट्रॅफिक नियमांचे जास्त उल्लंघन होऊ शकते आणि परिणामी काय समस्या उद्भवू शकतात, याचे अंदाज हे डिजाईन सांगू शकेल.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

एमआयटी समूहाचे महासंचालक मुनिश शर्मा यांच्याहस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामोद्योगिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. यज्ञवीर कवडे, मंडळाच्या सदस्या डॉ. शकुंतला लोमटे, एमआयटीचे प्राचार्य डॉ. निलेश पाटील, उपप्राचार्य डॉ. सय्यद अजिज, डॉ. एच. एम. धर्माधिकारी, संगणक विभाग प्रमुख डॉ. राधाकृष्ण नाईक, डॉ. आरती मोहनपूरकर यांची मुख्य उपस्थिती होती.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा