mahayuti
sakal
छत्रपती संभाजीनगर - महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप महायुतीवर स्थानिक नेत्यांत काही एकमत होईना. दोघांनाही एकमेकांनी दिलेले प्रस्ताव मान्य नसल्याने दोन्ही पक्षांचे प्रस्ताव मुंबईतील वरिष्ठ नेत्यांकडे पाठवले. आता युती होईल की नाही, याचा निर्णय मुंबईतून ठरणार असल्याचे सूत्रांनी शनिवारी (ता. २७) सांगितले.