
देशातील पहिला आणि जगातील पाचवा दिव्यांग आयर्न मॅन म्हणून ओळख असणाऱ्या निकेत श्रीनिवास दलाल यांचं निधन झालं. छत्रपती संभाजीनगरमधील समर्थनगर इथल्या एका हॉटेलच्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला. माजी उपमहापौर लता दलाल यांचे ते पुत्र होते. दलाल यांच्या निधनामुळे शहरात शोककळा पसरली आहे. निकेत दलाल हे ४३ वर्षांचे होते.