esakal | अक्षय तृतीयेचा सण जाणार विनाखरेदीचा
sakal

बोलून बातमी शोधा

NEWS

कोरोनाचा जगभर कहर सुरू आहे. यामुळे शेअर मार्केट कोसळले आहेत. यामुळे शेअर मार्केटऐवजी सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोक सोने-चांदीकडे वळले आहेत. यामुळेच सोन्या-चांदीच्या किंमती वाढत चालल्या आहेत.

अक्षय तृतीयेचा सण जाणार विनाखरेदीचा

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या सणावर कोरोनाचा मोठा परिणाम जाणवत आहे. लॉकडाऊनमुळे महिनाभरापासून सोने-चांदीचे दुकाने बंद आहेत. गुढीपाडवा व इतर सणाच्या वेळीही अशीच परिस्थिती होती. यामुळे सराफा मार्केटमधून होणारी कोट्यावधीची उलाढाल ठप्प आहे. गेल्या महिनाभरात सराफा मार्केटला ६० ते ७० कोटींचा फटका बसल्याचे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी सांगितले. 

कोरोनाचा जगभर कहर सुरू आहे. यामुळे शेअर मार्केट कोसळले आहेत. यामुळे शेअर मार्केटऐवजी सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोक सोने-चांदीकडे वळले आहेत. यामुळेच सोन्या-चांदीच्या किंमती वाढत चालल्या आहेत. एका दिवसात सोन्याची किंमत सहाशे ते सातशे रुपये प्रतितोळा वाढली आहे. यामुळे आठवड्याभरात सोन्याच्या किमती ५० हजारांपर्यंत जाईल असा अंदाजही तज्ज्ञांतर्फे वर्तविण्यात येत आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने-चांदी, घर, वाहन खरेदी करण्यात येते. लॉकडाऊनमुळे महिनाभरापासून सर्व व्यवहार ठप्प आहे. कुठलेही सराफाचे दुकान उघडणार नसल्याने हा सण विना खरेदीची जाणार आहे. काही मोठ्या सराफा व्यवसायिकांनातर्फे ऑनलाईन बुकींग घेण्यात येत आहे, मात्र याला अत्यल्प प्रतिसाद आहे. 

गावांतील दुकाने सुरू राहणार 
शहरात १ हजार २०० तर ग्रामीणमध्ये साडेतीन ते चार हजार सराफा व्यवसायिक आहेत. अक्षय तृतीयेला केवळ गाव पातळीवरील सराफा व्यावसायिक दुकाने सुरू करू शकतत. मात्र त्यांच्याकडेही फारसा ग्राहक येईल, याची शाश्‍वती नाही, असेही राजेंद्र मंडलिक यांनी सांगितले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

लॉकडाऊननंतर गृहखरेदी वाढेल 
गुढीपाडवा व अक्षय तृतीयेला घर खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत लोक बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे सध्याच्या स्थितीला शहरातील कोणत्याच बांधकाम व्यवसायिकाकडे विचारणा होत नाही. लॉकडाऊन नसता तर पाडवा आणि अक्षय तृतीयेला घरांची बुकिंग तसेच अनेक जणांनी गृहप्रवेश केला असता. रियल इस्टेट अजूनही पॉझिटिव्ह आहे. कारण लॉकडाउन संपल्यानंतर बहुतांश चीनमधील उद्योग भारतात येतील, यामुळे उलाढाल वाढेल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. यातून रियल इस्टेटलाही चालना मिळून घर खरेदी विक्री वाढेल, असे क्रेडाईचे अध्यक्ष नरेंद्र जबिंदा यांनी सांगितले