खासदार ओमराजे निंबाळकरांना मोठा दिलासा, 'तो' गुन्हा रद्द; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

MP Omraje Nimbalkar खासदार ओमराजेंविरोधातील आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा आणि दोषारोपपत्र हायकोर्टानं रद्द केलं आहे. औरंगाबाद खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी पार पडली.
MP Omraje Nimbalkar

MP Omraje Nimbalkar

Esakal

Updated on

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधाती गुन्हा आणि दोषारोपपत्र रद्द कऱण्यात आलंय. मुंबई हायकोर्टानं खासदार ओमराजेंना मोठा दिलासा दिला आहे. तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना, ढोकी येथील तोडणी मुकादम दिलीप शंकर ढवळे यांच्या आत्महत्या प्रकरणात खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निंबाळकरांसह इतर चार अर्जदारांविरोधातील गुन्हा आणि दोषारोपपत्र रद्द केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com