esakal | CoronaUpdate: जूनच्या १४ दिवसांतच औरंगाबादेत ११९६ बाधित, आज वाढले ११३ रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

CoronaVirus Image.jpeg

शहरात कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत नाही. आज (ता. १४) सकाळच्या सत्रात  ११३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. एक जून ते १४ जूनपर्यंत १ हजार १९६ रुग्ण वाढले असून ही वाढ गंभीर आहे.

CoronaUpdate: जूनच्या १४ दिवसांतच औरंगाबादेत ११९६ बाधित, आज वाढले ११३ रुग्ण

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद: शहरात कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत नाही. आज (ता. १४) सकाळच्या सत्रात  ११३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. एक जून ते १४ जूनपर्यंत १ हजार १९६ रुग्ण वाढले असून ही वाढ गंभीर आहे.
औरंगाबादेत आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ हजार ७३९ झाली आहे. यापैकी १ हजार ४५१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १४३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता १ हजार १४५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

आज आढळलेले ११३ रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) -  

राजाबाजार (२),  न्यू हनुमान नगर (२), बायजीपुरा(१), खोकडपुरा (२), बंबाटनगर, बीड बायपास (२), साई नगर, एन- सहा (२), राजमाता हाऊसिंग सोसायटी (१), माया नगर, एन- दोन (३),  संजय नगर, आकाशवाणी परिसर (१), रशीदपुरा (२),  यशोधरा कॉलनी (२),  सिडको पोलिस स्टेशन परिसर (१),  सिल्क मील कॉलनी (१), किराडपुरा (१), पीरबाजार (१), शहानूरवाडी (१), गजानन मंदिर परिसर, गारखेडा (२),

अहिल्या नगर, मुकुंदवाडी (१), जहाँगीर कॉलनी, हर्सुल (१), कैलास नगर (१), समर्थ नगर (१), छावणी परिसर (४), गौतम नगर (१), गुलमंडी (५), भाग्य नगर (१), गजानन नगर, गल्ली क्रमांक - नऊ (४), मंजुरपुरा (१), मदनी चौक (१), रांजणगाव (१), बेगमपुरा (१), रेहमानिया कॉलनी (१), काली मस्जिद परिसर (१), क्रांती चौक परिसर (१), विश्रांती नगर (१), कन्नड (५), जिल्हा परिषद परिसर (४), देवगिरी नगर, सिडको वाळूज (१), बजाज नगर (१५),

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

राम नगर (१), देवगिरी कॉलनी सिडको (२), वडगाव कोल्हाटी (२), स्नेहांकित हाऊसिंग सोसायटी (१), नक्षत्र वाडी (२), बकलवाल नगर, वाळूज (१), सलामपूर, पंढरपूर (११), वळदगाव (१), साई समृद्धी  नगर कमलापूर (२), अज्वा नगर (१), फुले नगर, पंढरपूर (४), गणेश नगर, पंढरपूर (१), वाळूजगाव, ता. गंगापूर (१), शाहू नगर, सिल्लोड (१), मुस्तफा पार्क, वैजापूर (१), अन्य (२) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये ३८ स्त्री व ७५ पुरूष रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण - १४५१
उपचार घेणारे रुग्ण - ११४५
एकूण मृत्यू  - १४३
आतापर्यंत बाधित रुग्ण - २७३९

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा