औरंगाबादेत कार-ट्रकच्या अपघातात १ ठार, एसटी चालकामुळे ५१ प्रवासी बचावले

ट्रकच्या पाठीमागील बसच्या चालकाने अचानक समोर घडलेल्या प्रसंगातही प्रसंगावधान राखीत...
Aurangabad Accident News
Aurangabad Accident Newsesakal

करमाड (जि.औरंगाबाद) : चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार रस्ता दुभाजक फोडून दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या भरधाव ट्रकला धडकून झालेल्या अपघातात कारमधील एक जण जागीच ठार, तर चालक किरकोळ जखमी झाला. दरम्यान, ट्रकच्या पाठीमागील बसच्या चालकाने अचानक समोर घडलेल्या प्रसंगातही प्रसंगावधान राखीत बस रस्त्याच्या खाली घालत एका लोखंडाच्या दुकानातील लोखंडी सळ्यावर व दगडी कंपाउंडच्या बांधकामाला धडकवल्याने गाडीत असलेल्या ५१ प्रवाशांचे प्राण वाचले. हा भयंकर अपघात शेंद्रा एमआयडीसीच्या (Shendra MIDC) कुंभेफळ फाट्याजवळील श्री साई इंटरप्रायजेस या दुकानासमोर सोमवारी (ता. २५) रात्री पावणे अकराच्या सुमारास घडला.

Aurangabad Accident News
राज यांच्या सभेपूर्वीच औरंगाबादेत मनसेला धक्का,दाशरथे भाजपमध्ये करणार प्रवेश

सदरील कार ही जालना येथील एसआरजे स्टील या लोखंडी सळ्या बनवणार्‍या कंपनीची असल्याचे कळते. या घटनेत चालकाच्या बाजूला बसलेले कंपनीचे वसुली अधिकारी अमेर उस्मानी (वय ४२, जालना) यांचा जागीच मृत्यू, तर कार चालक दत्ता मोरे (वय ३८, अंबड, जि.जालना) यांच्या डोक्याला किरकोळ मार लागुन ते जखमी झाले. सदरील कार (एमएच २१ एएच ६३९८) ही औरंगाबाद येथून जालन्याकडे चालली होती. शेंद्रा एमआयडीसीच्या कुंभेफळ फाट्यावरून पुढे जाताच लाडगाव उड्डाणपुलाच्या अलीकडे कार चालकाचा गाडीवरील अचानक ताबा सुटला व गाडी थेट चालू रस्त्यावरून रस्ता दुभाजक फोडून रस्त्याच्या दुसर्‍या बाजुला फेकल्या जाऊन ती जालना येथून औरंगाबादच्या (Aurangabad) दिशेने लोखंडी सळ्या भरून जाणार्‍या ट्रकला (टीएस १३ व्हीसी ७२४१ ) धडकली.

Aurangabad Accident News
अनिल देशमुखांवर परमबीर सिंग यांनी केलेले आरोप खोटे, चांदीवाल अहवालात स्पष्ट

ही धडक एवढी जोराची होती की ट्रकने ही कार सुमारे शंभर फुट अक्षरशः क्लिनर बाजुने घसरत गेली. यात चालक बाजूपर्यंत कार पुर्णत: कापली गेल्याने मृत अमेर यांना गाडीतुन काढताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. याच वेळी या ट्रकमागे हिंगोली डेपोची हिंगोली ते पुणे जाणारी बस (एमएच ०६ एस ८६४५) होती. ही बस समोरील सळ्या भरलेल्या ट्रकला धडकणार तोच क्षणाचाही विलंब न करता बसचालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या खाली घालून मुद्दामहुन रस्त्यालगत असलेल्या लोखंडी सळ्यावर घातली. यात बस लोखंडी सळ्यावरून चढुन दुकानाच्या दगडी बांधकाम असलेली कंपाऊंडची सुमारे दहा फुट भिंत फोडत दुकानातील लोखंडी रॅक व लिंबाच्या झाडाला धडकत बंद पडली. त्यामुळे बसमध्ये बसलेल्या ५१ प्रवाशांचे जीव वाचू शकले. या घटनास्थळावरून अवघ्या दहा फुट अंतरावर रस्त्यालगत भला मोठा खड्डा होता. बस चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या घटनेत श्री साई इंटरप्रायजेस दुकानाचे संचालक रावसाहेब शेळके यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यात दोन टन लोखंडी सळ्या पूर्णपणे बेंड झाल्या आहेत.

Aurangabad Accident News
सदावर्तेंना HC चा दिलासा; पुण्यातील तक्रारीसाठी अटकपूर्व जामीन

कंपाऊंडची दगडात पक्की बांधकाम केलेली भिंत कोसळली व शेजारील सुमारे पंचवीस फुट लांब व दहा फुट उंचीचे ठेवलेले लोखंडी रॅकही मोडकळीस गेला आहे. एकीकडे आपल्या सळ्या व पक्क्या भिंतीमुळे प्रवाशांचेे जीव वाचल्याचा आनंद श्री. शेळके यांना झाला. मात्र, दुसरीकडे आपले दोन लाख रुपयांचे नुकसान एस टी महामंडळाने भरून देण्याची मागणी त्यांनी बस चालकामार्फत व करमाड पोलिसांकडे केली आहे. नुकसान भरपाई न मिळाल्यास थेट परिवहन मंत्र्याकडे धाव घेण्याचा इशाराही रावसाहेब शेळके त्यांनी यावेळी प्रसिध्दी माध्यमासमोर बोलताना दिला. यातच एसटी महामंडळाच्या गलधान कारभारातुन दुपारपर्यंत ही बस बाजुला न केल्या गेल्याने दुपारपर्यंत दुकान बंद ठेवावे लागल्याचे श्री. शेळके यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com