शेतमालावर चोरट्यांचा डल्ला, शेतकरी धास्तावला

अनेकांचे उद्योग, व्यवसाय बंद पडले आहेत. शेतीतील शेतमाल तसेच भाजीपाला, फळांचे उठाव होत नसल्याने मोठे नुकसान झाले आहे.
नालासोपाऱ्यातील मंदिरात चोरी
नालासोपाऱ्यातील मंदिरात चोरी

उस्मानाबाद : कोरोनाच्या (Corona) संकटाने सामान्य नागरिक हवालदिल झालेला असताना शेतमालावर (Agriculture Produce) डल्ला मारणारी चोरट्यांची टोळी कार्यरत झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग धास्तावला असून, पोलिसांना मात्र याचा सुगावा लागत नाही. या टोळीला पकडण्याचे आवाहन पोलिसांसमोर आता उभे राहिले आहे. जिल्ह्यात (Osmanabad) कोरोनाच्या संकटाने संपूर्ण अर्थकारण ठप्प झाले आहे. अनेकांचे उद्योग, व्यवसाय बंद पडले आहेत. शेतीतील शेतमाल तसेच भाजीपाला, फळांचे उठाव होत नसल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी (Farmer), सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत सध्या चोऱ्यांचे सत्र सुरू झाले आहे. कोरोनाच्या हल्ल्यातून वाचल्यानंतर आता चोरट्यांच्या डल्ल्याने शेतकरी, सामान्य नागरिक आर्थिक संकटात जात आहे. जिल्ह्यात चोरट्यांची टोळी कार्यरत झाली आहे. शेतमाल अगदी हातोहात लंपास केला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी नाकाबंदी करून चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. (Osmanabad Latest News Agriculture Produces Stealing Cases Increases In District)

नालासोपाऱ्यातील मंदिरात चोरी
व्हेंटीलेटर्ससंदर्भात संपूर्ण माहिती सादर करा, औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश

या ठिकाणी झाली चोरी

सकनेवाडी (ता. उस्मानाबाद) येथील सूर्यातेज फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या गोडावूनमधून चोरट्यांनी सुमारे अडीच टन हरभरा लंपास केला आहे. अडीच लाख रुपयांचा माल चोरट्यांनी ३० एप्रिलच्या एका रात्रीत लांबविला. विशेष म्हणजे वाहनाशिवाय चोरी होऊ शकत नाही. रात्रीच्या वेळी चोरटे शेतमालावर टोळीसह डल्ला मारीत असल्याचे यावरून दिसून येत आहे. दरम्यान, हा चोरीचा प्रकार घडल्यानंतर १४ मेच्या पहाटे वरुडा रोड (ता. उस्मानाबाद) येथील ओडीएसएफ या बियाणे उत्पादक कंपनीच्या गोडावूनमधून ५० बॅग सोयाबीन चोरट्यांनी लंपास केले. विशेष म्हणजे सिक्युरिटी गार्ड असतानाही चोरट्यांनी गुंगारा देऊन सोयाबीन बियाणांवर डल्ला मारला. रात्रीच्या वेळी वारे आणि पाऊस असल्याचा फायदा घेत सोयाबीन लांबविले. १७ मे रोजी खामगाव (ता. उस्मानाबाद) येथील गणराज्य ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या गोडाऊनमधून सोयाबीनचे कट्टे लांबविले. विशेष म्हणजे सात ते आठजण गोडाऊन परिसरात झोपले होते. रात्रभर सोसाट्याचा वारा असल्याने शेतातही मोठी हालचाल सुरू होती. त्यामुळे तेथील नागरिकांना चोरट्यांचा अंदाज आला नाही. मात्र, गोडाऊनच्या वरील बाजूने शिडी लावून चोरट्यांनी सोयाबीनचे कट्टे काढले. नंतर उसाच्या शेतातून डोक्यावर माल घेऊन वाहनाने सोयाबीन लंपास केले. विशेष म्हणजे अगदी हातोहात चोरटे सोयाबीन लांबवत असल्याचे दिसून येत आहे. ही चोरट्यांची टोळी पोलिसांना चांगलाच गुंगारा देत आहे. तिन्ही ठिकाणी पोलिसांनी श्वान पथकाने पाहणी केली. मात्र, त्यातून फारसे काही निदर्शनास आले नाही. याशिवाय पोलिसांना या तिन्ही चोरीचा सुगावा लागत नसल्याने पोलिसांनाच आता चोरट्याने आवाहन दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com