esakal | रेमडेसिविर इंजेक्शनशिवाय झाला इलाज, तरुणाने केली कोरोनावर मात
sakal

बोलून बातमी शोधा

पृथ्वीराज राठोड

रेमडेसिविर इंजेक्शनशिवाय झाला इलाज, तरुणाने केली कोरोनावर मात

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : कोरोनाचा संसर्ग वयाची साठी ओलांडलेल्या नागरिकांना जिव्हारी लागत असताना तरुणालाही संसर्गाने सोडले नाही. रोग प्रतिकारशक्ती असतानाही भितीने तरुणांचे ऑक्सिजन पातळी कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील बलसूर तांडा येथील तीस वर्षीय पृथ्वीराज जैनू राठोड याने ऑक्सिजन पातळी कमी झालेले असतानाही प्रबळ इच्छाशक्तीने उपचाराला प्रतिसाद देत कोरोनावर मात केली आहे. दरम्यान उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी योग्य उपचार केल्याने कोरोनावर मात करू शकलो, अशी भावना पृथ्वीराजने व्यक्त केली आहे.

हेही वाचा: खासदार जलील रुग्णांच्या मदतीला, घाटीला चार हजार सलाईनच्या बॉटल्स दिल्या भेट

पृथ्वीराजने भीतीपोटी दवाखान्यात योग्य वेळी दाखवले नव्हते. औषधी दुकानातून तेवढेच गोळ्या घेतल्या. पण श्वसनाचा खूप त्रास सुरू झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात २२ एप्रिलला दाखल झाला. त्यावेळी दोन दिवस खूप त्रास झाला. ऑक्सिजन पातळी ऐंशीपर्यंत होते. डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी इंजेक्शन, गोळ्या, ऑक्सिजनचा पुरवठा केल्याने नवव्या दिवशी पृथ्वीराज बरा झाला आहे. दरम्यान गुरुवारी (ता.२९) पृथ्वीराजच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या टीमचा सत्कार केला. पृथ्वाराजला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून तूर्त त्यांना सुरक्षिततेसाठी माऊली प्रतिष्ठानच्या कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे.

हेही वाचा: जिगरबाज १०५ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, खचून न जाता धीराने सामोरे जाण्याचा सल्ला

कोरोनाची लक्षणे जाणवताच तपासणी व उपचार महत्त्वाचा आहे. ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असल्यान भीती वाटत होती. पण वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक बडे, नोडल अधिकारी डॉ. विक्रम आळंगेकर, फिजीशियन डॉ. सोमनाथ कवठे, स्वाती डोंगरे, राखी वाले याच्या सहकार्याने रेमडेसिविर शिवाय दुसऱ्या औषधाच्या उपचाराने मी लवकर बरा झालो. आता मी व्यवस्थित आहे. दवाखान्यातील सर्व टीम खूप मेहनत घेतात. तेथील सुविधा खूप चांगली आहे. रुग्णांनी डॉक्टरवर विश्वास ठेवून सहकार्य करणे अपेक्षित आहे.

- पृथ्वीराज राठोड

loading image