Aurangabad: पैठणमध्ये शक्तिप्रदर्शन! CM शिंदेंची पेढ्याने तर भुमरेंची लाडूतुला होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde Sandipan Bhumare
Aurangabad: पैठणमध्ये शक्तिप्रदर्शन! CM शिंदेंची पेढ्याने तर भुमरेंची लाडूतुला होणार

Aurangabad: पैठणमध्ये शक्तिप्रदर्शन! CM शिंदेंची पेढ्याने तर भुमरेंची लाडूतुला होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबाद दौरा सुरू होण्याआधीच चर्चेत आला आहे. पैसे देऊन लोक बोलावणं, गर्दी करण्यासाठी विशेष आदेश काढणं, अशा अनेक चर्चा या सभेआधी होत होत्या. आता एकनाथ शिंदे यांची पेढेतुला होणार असल्याचंही सांगितलं जात आहे. फक्त शिंदेच नव्हे तर संदिपान भुमरे यांचीही लाडूतुला होणार आहे.

हेही वाचा: Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन जमवणार गर्दी? ऑडिओ क्लिप व्हायरल

आज दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा पैठणमध्ये होणार आहे. त्यापूर्वी त्यांची पेढ्यांनी तुला केली जाणार आहे. तर संदिपान भुमरे यांची लाडूतुला होणार आहे. ठाकरे गटातून बाहेर पडून शिंदे गटात गेलेले संदिपान भुमरे आज पैठणमध्ये शक्तिप्रदर्शन करणार आहेत. या सभेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

हेही वाचा: CMच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी कसरत; अंगणवडी सेविकांना हजर राहण्याचे सरकारी आदेश

यासाठी १०० किलो पेढे तयार करण्यात आले आहेत. तर संदिपान भुमरे यांच्या तुलेसाठी १०० किलो लाडूही तयार करून ठेवण्यात आले आहेत. हे लाडू आणि पेढे तयार करण्यासाठी सहा तास लागले आहेत. लाडू आणि पेढ्यांसाठी दोन्हीसाठी प्रत्येकी १७ हजार रुपये खर्च आला आहे. या पेढ्यांसाठी ७० किलो खवा वापरण्यात आला आहे. या आधी आदित्य ठाकरेही औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. त्यांना प्रतिशह देण्यासाठी भुमरे यांनी या सभेचं आयोजन केलं आहे. पहिल्यांदाच मुख्यमंत्री औरंगाबाद मध्ये येत आहेत.

Web Title: Paithan Aurangabad Cm Eknath Shinde Mla Sandipan Bhumare Preparations

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..