esakal | पंचवीस वर्षांपूर्वी मायलेकीची ताटातूट, पाकिस्तानातून भारतात परतलेल्या गीताच्या आईवडिलांचा लागला शोध
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan Return Geeta Parents Found In Aurangabad's Waluj Area

गीता ही पाकिस्तानातुन भारतात परतल्यानंतर तिच्या कुटुंबियाचा शोध सुरु होता. अशातच जिंतुरला गिताच्या नातेवाईकांनी तिला ओळखत तिची आई मिना वाघमारे - पांढरे यांच्याशी संपर्क साधुन माहिती दिली.

पंचवीस वर्षांपूर्वी मायलेकीची ताटातूट, पाकिस्तानातून भारतात परतलेल्या गीताच्या आईवडिलांचा लागला शोध

sakal_logo
By
रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद) : सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी जिंतुर (जि.परभणी) येऊन बेपत्ता झालेली व पाकिस्तानातून भारतात आलेल्या मुकबधीर गीता ऊर्फ राधाच्या कुटुंबियाचा शोध लागला आहे. गिताची आई मिना वाघमारे व सावत्र वडील दिनकर पांढरे हे वाळूज परिसरातील बकवालनगर येथे राहतात. चोवीस वर्षांपूर्वी राधा ही चार ते पाच वर्षांची असताना घरातुन निघुन गेली होती. तिचा शोध घेऊनही ती मिळून न आल्याने तिचे आईवडीलानी तिची शोध मोहिम थांबवली होती. ती पाकिस्तानात सापडली. मात्र ती गतिमंद असल्याने तिला आईवडिलांचे नाव व पत्ता सांगता येत नव्हता.

ती भारतीय असल्याने पाकिस्तानने चार वर्षांपूर्वी तिला भारताच्या स्वाधीन केले होते. त्यानंतर कुटुंबियांचा देशभरात शोध सुरु झाला. अशातच जिंतुर येथील वाघमारे कुटुंबियांनी बेपत्ता झालेली गिता हिचे खरे नाव राधा असून ती चार ते पाच वर्षांची असताना बेपत्ता झाल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर दोन महिन्यांपूर्वी गीता ऊर्फ राधाची परभणी व जिंतूर येथे तिची जन्मदात्री मिना वाघमारे-पांढरे हिची भेट घडवुन आणली होती. या भेटीत गीता व मिना यांनी एकमेकींना ओळखल्याचा दावाही तिची आई मिना वाघमारे यांनी केला आहे. दरम्यान गीताचे आईवडील वाळूजजवळील बकवालनगरात राहत असल्याची माहिती मिळाल्याने तिची आई मिना व सावत्र वडील दिनकर पांढरे यांची  बुधवारी (ता.११) रोजी भेट घेऊन गिताच्या बेपत्ता होण्याचे गुढ जाणुन घेतले.

यावेळी मिना वाघमारे म्हणाल्या की, त्या मूळच्या जिंतुर येथील असून पतीचे नाव सुधाकर वाघमारे आहेत. सुधाकर वाघमारे यांच्यापासून मिना यांना गीता ऊर्फ राधा, पुजा व गणेश अशी तीन अपत्ये झाले. राधा ही जन्मजात मुकबधीर असून तिला वाहनात बसण्याचा छंद होता. त्यामुळे गीता ही कोणत्यातरी वाहनात बसून गेल्याने ती बेपत्ता झाली होती. तिचा अनेक दिवस शोध घेतला. मात्र ती मिळाली नाही. कालांतराने सुधाकर वाघमारे यांचे निधन झाल्याने व कुटुंबाची आर्थिक परिस्थती बिकट असल्याने मीना वाघमारे या पुजा व गणेश यांना घेऊन वाळूज औद्योगिक वसाहतीतीत पोट भरण्यासाठी आल्या. त्यानंतर मिना वाघमारे यांची वाळूज जवळील बकवालनगर येथे राहणारे दिनकर पांढरे यांच्याशी पाकिस्तानातुन चार वर्षापुर्वी भारतात परतलेल्या गिताचे आई व सावत्र वडिल वाळूजच्या बकवालनगरात ओळख  होऊन त्यांच्या सोबत मिना वाघमारे यांनी लग्न केले. त्या मिना पांढरे या नावाने परिसरात परिचित आहेत. दरम्यान वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे, पोलीस काँस्टेबल पांडुरंग शेळके, प्रदीप बोरुडे यांनी गीता उर्फ राधाची आई मिनाबाई व सावत्र वडील दिनकर पांढरे यांची  भेट घेऊन चौकशी केली.
 


शरीरावरील खुणामुळे पटली ओळख : दरम्यान, गिता ही पाकिस्तानातुन भारतात परतल्यानंतर तिच्या कुटुंबियाचा शोध सुरु होता. अशातच जिंतुरला गिताच्या नातेवाईकांनी तिला ओळखत तिची आई मिना वाघमारे - पांढरे यांच्याशी संपर्क साधुन माहिती दिली. या माहितीनंतर मिना पांढरे यांनी दोन महिन्यापुर्वी जिंतुरला जाऊन गिता उर्फ राधाची भेट घेतल्यानंतर दोघींनी एकमेकींना ओळखल्याचे मिना पांढरे यांचे म्हणणे आहे. राधा हिच्या अंगावर असलेल्या खुणावरुन तिची ओळख पटल्याचा दावा मिना वाघमारे यांनी केला आहे.
 

शासनाने मदत केल्यास गिताचा सांभाळ करणार :  गीता उर्फ राधा हिची आई मिना वाघमारे यांची अर्थिक परिस्थिती हलाखीची असून तिचे सावत्र वडीलही आता थकले आहे. मिना पांढरे या घरासमोर भाजीपाला विक्री करुन उदरनिर्वाह करतात. गीताला सांभाळण्याची त्यांची इच्छा आहे. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे तिचा सांभाळ करण्याची ऐपत नसल्याचे मीनाबाई सांगते. शासनाकडून अर्थिक मदत मिळाल्यास गीता उर्फ राधाचा सांभाळ करण्याची तयारी मिना पांढरे यांनी दर्शविली आहे.

संपादन - गणेश पिटेकर

loading image