

Sambhajinagar PM Awas Yojana
esakal
फुलंब्री: शहरातील प्रत्येक गरजू कुटुंबाला हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजना २.० (अंतर्गत फुलंब्री नगरपंचायतीच्या वतीने पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सोमवारी (ता. १६) नगरपंचायत कार्यालयात आयोजित विशेष मेळाव्यात ९४ पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्रांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.