esakal | आडमार्गात का उतरले विदेशी पर्यटक : वाचा 
sakal

बोलून बातमी शोधा

photo

मध्यरात्री लासुर स्टेशनला चुकीने उतरलेल्या जोडप्याला मदतीचा हात 

आडमार्गात का उतरले विदेशी पर्यटक : वाचा 

sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगाबाद : अजंठा एक्‍सप्रेस मधून प्रवास करणारे विदेशी पर्यटक औरंगाबाद ऐवजी चुकून लासुर स्टेशनला उतरले. ही बाब लक्षात येताच रेल्वे सेनेच्या कार्यकर्त्यांनी ग्रामिण पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनीही तात्काळी पोलिसांची टीम मदतीला पाठवली. अवघ्या दहा मिनिटात या विदेशी पर्यटकांना वाहनाची व्यवस्था करुन वेरुळपर्यंत सोडण्यात आले. 

इंग्लड येथील पर्यटक जोडपे मुंबई येथून वेरुळ अजिंठा लेणी पहाण्यासाठी औरंगाबाद शहरात आले होते. गुरुवारी (ता. 13) रात्री ते अजंठा एक्‍सप्रेसने मनमाडहून आले, मात्र ते औरंगाबाद पुर्वीच म्हणजे लासुर स्टेशनला उतरले. उतरल्यानंतर आपण आडमार्गाच्या रेल्वेस्टेशनला उतरल्याचे त्यांच्या लक्षात आले.

वाचा कसा -  दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीत हलगर्जीपणा    

रात्रीचे दहा वाजले होते, आता काय करावे हे त्यांच्या लक्षात येत नव्हते, त्याचवेळी उपस्थित रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वेसेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना माहिती दिली. काही वेळातच सोमाणी रेल्वेस्टेशनला दाखल झाले. त्यांनी विदेशी पर्यटकांशी संवाद साधला, त्यावेळी आपण वेरूळ लेणी पहाण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगीतले. आता पुढे कसे जाणार अशी ते विचारणा करत असतानाच श्री. सोमाणी यांनी ही माहिती ग्रामिण पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांना दिली.

हेही वाचा  राज ठाकरे अडकले, आणि मग...   

सेनेच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरे यांनी काय केले  

विदेशी पर्यटक असल्याने त्यांना तात्काळ मदतीची गरज असल्यामुळे श्रीमती पाटील यांनीही तातडीने लासुर पोलिसांना विदेशी पर्यटकांना मदत करण्यासाठी जाण्याचे आवाहन केले. त्यानुसार पोलिस निरिक्षक सय्यद शौकत यांनी लासुर रेल्वेस्थानकावर धाव घेतली. विदेशी पर्यटक जोडप्यांना घेऊन श्री. शौकत वेरुळच्या दिशेने निघुन गेले. रेल्वे सेना आणि पोलिसांच्या तत्परतेने अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात मिळालेली मदत पाहुन विदेशी पर्यटक जोडपे भारावून गेले. मदतीसाठी धावून आलेल्या सर्वांना धन्यवाद देत या जोडप्याने लासुरकरांचा निरोप घेतला. 

हे ही वाचा -  शाळांच्या अनुदानाची वाट मोकळी 

मदतीचा सिलसिला 

रेल्वे प्रवाशी सेना ही रेल्वेमार्गातील प्रवाशांच्या मदतीसाठी कायम तत्पर असते. प्रवासात हरवलेल्या बॅग मिळवून देणे, जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने रुग्णालयात पोहचवणे. किंवा विसरलेल्या प्रवाशांना अथवा मुलांना त्यांच्या घरापर्यंत पोहचवण्यासाठी रेल्वे सेनेने हजारो प्रवाशांना मदतीचा हात दिला आहे. 
 

loading image
go to top