

Former Mayor And Shinde Group Workers Thrashed By Police In Sambhajinagar
Esakal
राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. मतमोजणीला सुरुवात होण्याआधी छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा झाल्यानं गोंधळ उडाला आहे. गेटवरून उमेदवारांच्या प्रतिनिधींना आत सोडत असताना झालेल्या गोंधळानंतर शिंदे सेनेच्या कार्यकर्त्याला चोप देण्यात आला आहे. मंत्री शिरसाट यांच्या समर्थकाला चोप दिल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.