

Prasad Lad Receives Threat Calls Before Manoj Jarange Meeting, Two Arrested in Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेल्या आमदार प्रसाद लाड यांना फोनद्वारे धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. तसेच ज्या हॉटेलमध्ये प्रसाद लाड थांबले त्या हॉटेल जवळ पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.