esakal | Coronavirus : सिल्लोडमध्ये खळबळ, नकळत बाधित महिलेवर उपचार
sakal

बोलून बातमी शोधा

Private hospital seal at Sillod Dist Aurangabad

सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी तिला दाखल करण्यात आले. याठिकाणी तपासणी करून या महिलेस उपचारासाठी औरंगाबाद येथे
संदर्भित करण्यात आले होते.

Coronavirus : सिल्लोडमध्ये खळबळ, नकळत बाधित महिलेवर उपचार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिल्लोड (जि. औरंगाबाद) : शहरातील एका खासगी रुग्णालय व सोनोग्राफी सेंटर येथे दोन दिवसांपूर्वी उपचारासाठी येऊन गेलेल्या २२ वर्षीय महिलेची औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात प्रसूती झाली. प्रसूतीनंतर तिच्या कोविड-१९ च्या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे सिल्लोड येथे खळबळ उडाली असून, संबंधित रुग्णालय निर्जुंकिकरण करून सिल करण्यात आले आहे. शिवाय या रुग्णालयात उपचार घेतलेल्यांचे अलगीकरण करण्यात येत आहे. खासगी रूग्णालय व सोनोग्राफी केंद्रासह अंदाजे  शहरासह तालुक्यातील १२६ नागरिक संपर्कात आल्याचा अंदाज आहे. 

उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित सरदेसाई आणि डॉ. बाबूराव मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्वा (ता.भोकरदन) येथील एका २२ वर्षीय महिलेला दोन दिवसांपूर्वी प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. त्यामुळे सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी तिला दाखल करण्यात आले. याठिकाणी तपासणी करून या महिलेस उपचारासाठी औरंगाबाद येथे
संदर्भित करण्यात आले होते.

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा

महिलेची प्रसूती झाली. मात्र, तिच्या कोविड-१९ चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर या महिलेने सिल्लोड येथे उपचार घेतल्याचे कळताच शहरात एकच खळबळ उडाली. त्याचबरोबर ज्या रुग्णवाहिकेने या महिलेस औरंगाबाद येथे पाठविण्यात आले. दरम्यान, तिच्या संपर्कात आलेल्या दोन रुग्णवाहिका चालकाचे स्वॅब नमुनेही तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक श्री. सरदेसाई यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी मेडिकल सुरू ठेवले, पण हा पठ्ठ्या काय विकतोय पाहा
 
तीन दिवस जनता कर्फ्यू
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवार तीन दिवस जनता कर्फ्यू घोषित करण्यात असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे, तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी दिली. शहरासह तालुक्यात पुढील तीन दिवस जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा सुरू रहाणार आहे. दूध ठरावीक वेळेत उपलब्ध होणार आहे.