esakal | या अधिकारी दाम्पत्याने एका महिन्याचा पगार देऊन केली कार्डियाक रुग्णवाहिकेची खरेदी 
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad City news

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले

या अधिकारी दाम्पत्याने एका महिन्याचा पगार देऊन केली कार्डियाक रुग्णवाहिकेची खरेदी 

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद ः कोरोना काळात रुग्णांची ने-आण करण्यासाठी महापालिकेकडे रुग्णवाहिका नसल्याने मोठी अडचण होत होती. त्यामुळे प्रशासक आस्तिककुमार पांडेय व त्यांच्या पत्नी पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पुढाकर घेत रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी एका दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला. त्याला महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हातभार लावला व तीन रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या असून, गुरुवारी (ता. १७) सुसज्ज अशा कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. 

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार हरिभाऊ बागडे, अंबादास दानवे, अतुल सावे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय, पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, शहर अभियंता एस. डी. पानझडे, मुख्य लेखाधिकारी संजय पवार, विधी सल्लागार अपर्णा थेटे उपस्थित होते. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय व त्यांच्या पत्नी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचे एक महिन्याचे वेतन आणि महापालिकेचे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कोविड उपाय योजना कामासाठी जमा निधीतून अधिकारी-कर्मचारी संघटनेमार्फत तीन नवीन रुग्णवाहिका नागरी सुविधांसाठी खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज कार्डियाक रुग्णवाहिका जनतेसाठी उपलब्ध झाली. यावेळी पालकमंत्र्यांनी महापालिकेचे अभिनंदन केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या. पांडेय दाम्पत्याने रुग्णवाहिकेची पाहणी केली. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा 

मुक्ती संग्राम दिन उत्साहात 
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन पद्धतीने हजेरी लावत जनतेला शुभेच्छा दिल्या. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मानवंदना देऊन ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, आमदार हरिभाऊ बागडे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, अतुल सावे, अंबादास दावने, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हुतात्मा स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, नागरिकांची  उपस्थिती होती.
 

loading image