LTR19HTP02.jpg लातूर ः महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल डॉ. राजेश दरडे यांचा आपले आरोग्य आपलीच जबाबदारी फाऊंडेशच्या वतीने सत्कार करण्यात आला.
----
वैद्यकीय परिषदेवर निवडीबद्दल डॉ. दरडेंचा सन्मान
---
लातूर, ता. १९ ः महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे सदस्य म्हणून डॉ. राजेश दरडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल आपले आरोग्य - आपलीच जबाबदारी फाउंडेशनच्या वतीने नुकतेच त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने (ता. १५) प्रसिद्ध केलेल्या राजपत्रातील अधिसूचनेद्वारे डॉ. राजेश दरडे यांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. ‘आपले आरोग्य - आपलीच जबाबदारी फाउंडेशन’च्या ‘एक व्यक्ती - सहा संकल्प’ या सामाजिक उपक्रमाचेही खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी सन्मान केला. ‘उज्ज्वल भविष्य घडवूया’ या संकल्पनेतून रसायनमुक्त शेती, व्यसनमुक्त जीवन, पर्यावरण संरक्षण, कापडी पिशवीचा वापर, दररोज एक तास व्यायाम आणि दरवर्षी पाच झाडांची लागवड हे सहा संकल्प समाजातील प्रत्येक व्यक्तीने स्वीकारावेत, असा संदेश फाउंडेशनच्या माध्यमातून दिला जात आहे. कार्यक्रमास संजय राजुळे, दत्तात्रय परळकर, मारुती माने, शिरीषकुमार शेरखाने, राघवेंद्र देबडवार, संतोष सोनवणे, माधव तरगुडे, वीरभद्र तरगडे व सिद्धेश्वर जगाये यांची उपस्थिती होती.