esakal | नामविस्तार हा विद्यापीठाच्या इतिहासातील मैलाचा दगड : कुलगुरू प्रमोद येवले
sakal

बोलून बातमी शोधा

BAMU Renaming Day

जागतिकीकरणाच्या आजच्या काळात विद्यापीठाची नवी ओळख मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, अशी भावना कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.

नामविस्तार हा विद्यापीठाच्या इतिहासातील मैलाचा दगड : कुलगुरू प्रमोद येवले

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन हा विद्यापीठाच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे. जागतिकीकरणाच्या आजच्या काळात विद्यापीठाची नवी ओळख मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, अशी भावना कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.


यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून हा कार्यक्रम होणार आहे. याविषयी डॉ. येवले म्हणाले, २३ ऑगस्ट १९५८ आणि १४ जानेवारी १९९४ हे दोन्ही दिवस विद्यापीठाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंदवून ठेवण्यासारखे आहेत. ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना करताना मराठवाड्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे, अशी भावना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली होती.

त्यांचे नाव विद्यापीठाला देण्यात आले, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. बाबासाहेबांनी औरंगाबाद ही ‘शिक्षाभूमी’ तर नागपूरला ‘दीक्षाभूमी’ म्हणून ओळख मिळवून दिली. ही ओळख जपण्याचा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नावलौकिक उंचावण्याचा प्रयत्न आगामी काळात करू, असेही कुलगुरू डॉ.प्रमोद येवले म्हणाले.

Edited - Ganesh Pitekar

loading image