
Cyber Fraud
esakal
छत्रपती संभाजीनगर : ‘तुम्ही वाईट मार्गाने पैसा कमावला. तुमच्यावर ईडीची केस आहे. अटक टाळण्यासाठी पैसे द्यावे लागतील’ अशी थाप मारत सायबर भामट्याने निवृत्त प्राध्यापकाला ३३ लाखांचा गंडा घातला. सुदाम वामनराव राजभोज (वय ८७, रा. जयसिंगपुरा) असे फसवणूक झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे.