
कन्नड : दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सहा कोटी ११ लाख रुपये खर्चून औराळा फाटा ते जेहूर या सात किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र, दोन महिन्यांतच रस्ता ठिकठिकाणी उखडल्यामुळे रस्ताकामाचे पितळ उघडे पडले आहे. पावसाळ्यातील रस्ता सुस्थितीत राहील का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.