esakal | एमआयडीसीच्या वाट्याला ही सात रस्ते...
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad City news

महापालिका पाच रस्ते, एमएसआरडीसी चार रस्ते आणि एमआयडीसी पाच रस्ते असे १४ रस्ते काँक्रिटीकरणाचे होणार आहेत; तर नऊ रस्ते डांबरीकरणाचे केले जाणार आहेत. 

एमआयडीसीच्या वाट्याला ही सात रस्ते...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद-राज्य शासनाने शहरातील रस्त्यांसाठी नुकताच १५२ कोटी २४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, यातील सात रस्ते एमआयडीसीच्या वाट्याला आले आहेत. ४१ कोटींतून या रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. 

शहरातील रस्त्यांसाठी राज्य शासनाने १५२ कोटी २४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. रस्त्यांची कामे दर्जेदार व वेळेत व्हावीत म्हणून हा निधी महापालिका, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि औद्योगिक विकास महामंडळाला वाटून देण्यात आला आहे. त्यानुसार आदेश प्राप्त होताच एमएसआरडीसीने २१ ला सात रस्त्यांची निविदा काढली. त्यानंतर एमआयडीसीने ४१ कोटींची निविदा काढल्या; मात्र त्यात किती रस्त्यांचा समावेश आहे हे मात्र समोर आले नव्हते. सोमवारी (ता.२४) या निविदा वेबसाइटवर उघडल्यानंतर यात सात रस्त्यांचा समावेश असल्याचे समोर आले. दरम्यान, सोमवारीच महापालिकेमार्फत नऊ रस्त्यांची निविदा प्रसिद्ध झाली. आता तीनही एजन्सींनी काढलेल्या निविदांची रक्कम १३५ कोटींच्या घरात गेली आहे. 

क्‍लिक करा : महापालिका निवडणुक : बदल किरकोळ, गडबडी कायम

रस्त्यांची संख्या गेली २३ पर्यंत 
राज्य शासनाने १५२ कोटी २४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. निविदा मात्र १३५ कोटींच्या निघाल्या आहेत. रस्त्यांची संख्या २० एवढी सांगण्यात आली होती; मात्र प्रत्यक्षात २३ रस्त्यांच्या निविदा निघाल्या आहेत. हे रस्ते काँक्रिटीकरण व डांबरीकरणाद्वारे केले जाणार आहे. महापालिका पाच रस्ते, एमएसआरडीसी चार रस्ते आणि एमआयडीसी पाच रस्ते असे १४ रस्ते काँक्रिटीकरणाचे होणार आहेत; तर नऊ रस्ते डांबरीकरणाचे केले जाणार आहेत. 

या रस्त्यांचा समावेश 
 कॅनॉट प्लेसमधील अंतर्गत रस्ते 
 राज हाईटस्, एमजीएम ते एन-पाचमधील जलकुंभ 
 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान, एपीआय कॉर्नर जालना रोड ते कलाग्राम, गरवारे स्टेडियम मार्गे प्रोझोन मॉल आणि एपीआय कॉर्नर ते एन-एक पोलिस चौकी मार्गे सिडको बसस्थानक 
 साई मेडिसिटी हॉस्पिटल ते एस. एन. १५३ हर्सूल ३६ मीटर रस्त्याचे रुंदीकरण 
 एन-तीन साई ट्रान्स्पोर्ट जालना रोड ते शिवनाथ राठी यांचे घर, एन-चार, सिडकोमार्गे छत्रपती कॉलेज 
 ग्रीव्हज कॉटन ते जयभवानी चौक ते नारेगाव मार्गे अनिल केमिकल 
 पिया मार्केट ते सिटी चौक मार्गे सुराणा बिल्डिंग आणि पूल. 

हेही वाचा : स्टॅंप ड्युटीमुळे खेळण्याचे मार्केट संथ

loading image