सिग्नलला बांधला कपडा, रेल्वे थांबताच चोरट्यांचा डल्ला; 'नंदीग्राम'मधील थरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

सिग्नलला बांधला कपडा, रेल्वे थांबताच चोरट्यांचा डल्ला; 'नंदीग्राम'मधील थरार

औरंगाबाद : रेल्वेच्या सिग्नलला चोरट्यांनी कपडा बांधल्याने रेल्वे थांबताच दबा धरुन बसलेल्या चोरट्यांनी बोगीत प्रवेश करुन प्रवाशी महिलांचे दागिने, मोबाईल हिसकावल्याची घटना २ एप्रिलच्या रात्री १२ वाजून ५५ मिनिटांनी पोटूळ रेल्वे स्थानकाजवळ घडली. या प्रकरणी अज्ञातांविरोधात औरंगाबाद (Aurangabad) लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांच्या शोधासाठी चार विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या प्रकरणी लोहमार्ग पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबादकडून मुंबईकडे जाणारी नंदीग्राम एक्सपेस (Nandigram Express) ही २ एप्रिलच्या रात्री एक वाजेदरम्यान पोटूळ रेल्वेस्थानक परिसरात येत होती. दरम्यान चोरट्यांनी अगोदरच सिग्नलला कपडा बांधून ठेवलेला असल्याने रेल्वेच्या लोकोपायलटला सिग्नल दिसला नाही. त्यामुळे लोकोपायलटने रेल्वे थांबविली. (Robbery Incident In Nandigram Express At Midnight Aurangabad)

हेही वाचा: मुलाप्रमाणे जपलेल्या सतरा एकरावरील ऊस जळून खाक, शेतकऱ्याला अश्रू अनावर

त्याच वेळेस दबा धरुन बसलेल्या चोरट्यांनी एस-८ या रेल्वेबोगीत प्रवेश करत सुनिता सुभाष माचे (३५) या प्रवाशी महिलेचे सोन्याचे गंठण बळजबरी हिसकावले. तसेच दुसऱ्या सहप्रवाशाचा महागडा मोबाईल हिसकावून पळ काढला. त्याचवेळेस सहप्रवाशांनी चोरट्यांना पाठलाग केला असता, चोरट्यांनी दगड मारल्याने प्रवाशी जखमी झाले. याप्रकरणी औरंगाबाद लोहमार्ग पोलिसांत ३९४ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास निरीक्षक कांबळे करत आहेत.

तात्काळ लावली रात्रगस्त

सदर घटनेची माहिती मिळताच लोहमार्गच्या जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी घटनेचा आढावा घेत रात्रगस्त वाढविण्याचे आदेश त्या त्या जिल्ह्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. लोहमार्ग औरंगाबाद विभागातील पोलिस ठाण्यांच्या हद्दीत आऊटर सिग्नल परिसरात रात्रगस्त लावण्यात आली आहे.

हेही वाचा: महाविकास आघाडीचं उत्तम चाललयं, अशोक चव्हाणांचा फडणवीसांना टोला

लोहमार्ग औरंगाबाद विभागातील आपातकालीन प्रसंगी खालील क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिस ठाणे - मदत संपर्क क्रमांक

रेल्वे हेल्पलाईन १८२,

पोलिस नियंत्रण कक्ष - ७४९९९३८५८५

स्थानिक गुन्हे शाखा- भाले - ९७६४७५७५५५

शेगाव सहायक निरीक्षक मगर - ७५८८५७१७६५

भुसावळ निरीक्षक घेरडे - ७०३०८७६९९९

नंदूरबार सहायक निरीक्षक वावरे- ८८३०५०५१८५

चाळीसगाव सहायक निरीक्षक राख ७०३८९५८२४४

मनमाड निरीक्षक जोगदंड - ९७६५५२९७७७

नाशिक रोड निरीक्षक कुळकर्णी - ८९७५०२०४००

इगतपूरी सहायक निरीक्षक नाईक ९९२२०११५५८

नांदेड निरीक्षक उनवणे - ९८२३२३०५०३

औरंगाबाद निरीक्षक कांबळे - ९०७५०७४६६३

परळी सहायक निरीक्षक सोगे - ९८६०९२३०९८

हेही वाचा: ED मुळे फायरब्रँड राज ठाकरे हे 'फ्लाॅवर' का झाले? : रूपाली ठोंबरे

या प्रकाराची सविस्तर माहिती घेऊन गुन्ह्यातील चोरट्यांच्या शोधासाठी चार विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. रेल्वेप्रवासादरम्यान चोरी, दरोडा, विनयभंग, घातपाती तसेच संशयास्पत कृत्य निदर्शनास आल्यास संबंधित क्रमांकावर संपर्क करावा.

- मोक्षदा पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक, लोहमार्ग, औरंगाबाद.

Web Title: Robbery Incident In Nandigram Express At Midnight Aurangabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top