धावत्या कारला आग,चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी नाही | Aurangabad Live News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Burning Car In Aurangabad

धावत्या कारला आग,चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी नाही


अजिंठा (जि.औरंगाबाद ) : गोळेगाव (ता.सिल्लोड) गावानजीक साई ढाब्याजवळ आलिशान कारला अचानक आग लागल्याची घटना बुधवारी (ता.चार) सकाळी अकराच्या सुमारास घडली. कार चालकाने प्रसंगावधान राखून वाहन थांबवल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीने रौद्ररूप धारण केल्याने कार पूर्णपणे जळून खाक झाली. भरदिवसा महामार्गावर ही घटना घडल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण होते. मिळालेल्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील पानवडोद बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहसीन खान यांची कार घेऊन चालक आपल्या मित्रासोबत औरंगाबाद (Aurangabad) - जळगाव महामार्गावरून सिल्लोडकडे जात होते. (Running Car Catch Fire In Golegaon Of Aurangabad)

हेही वाचा: Nanded|फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला टिप्परने उडवलं, उपचार सुरु असताना मृत्यू

यावेळी गोळेगाव येथील साई ढाबानजीक असलेल्या वळण रस्त्यालगत कारला ( एमएच २० एफ वाय ५०९९) अचानक आग लागली. कारला आग लागल्याचे चालक अमीन पठाण याच्या लक्षात येताच त्याने तत्काळ गाडी थांबवली. आणि ते सर्वजण खाली उतरले. काही क्षणात आग भडकली. परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाशी संपर्क साधण्यात आला. मात्र, तोपर्यंत कार जळून खाक झाली.

हेही वाचा: Pfizer | फायझरने भारतात आशियातील सर्वात मोठे 'औषध विकास केंद्र' केले सुरु

या घटनेची अजिंठा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबा चव्हाण पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Running Car Catch Fire In Golegaon Of Aurangabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Aurangabad Newsajanta
go to top