esakal | जन्मकुंडलीनुसार भ्रमण करताना शनि कोणत्या राशीला काय फळ देईल.. 
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

साडेसातीचा प्रभाव प्रत्येकाच्या कुंडलीनुसार वेगवेगळा मिळतो. शनीचं भ्रमण कुंडलीतील ज्या स्थानातून/राशीतून सुरु असतं, त्या स्थानावरून जीवनातील त्या त्या गोष्टींवर शनीचा प्रभाव पडतो. राशीनुसार तर शनि महाराज फल देतात. 

जन्मकुंडलीनुसार भ्रमण करताना शनि कोणत्या राशीला काय फळ देईल.. 

sakal_logo
By
टीम ई सकाळ

साडेसातीचा प्रभाव प्रत्येकाच्या कुंडलीनुसार वेगवेगळा मिळतो. शनीचं भ्रमण कुंडलीतील ज्या स्थानातून/राशीतून सुरु असतं, त्या स्थानावरून जीवनातील त्या त्या गोष्टींवर शनीचा प्रभाव पडतो. राशीनुसार तर शनि महाराज फल देतातच. पण, जन्मकुंडलीनुसार कोणत्या स्थानातून शनिमहाराज भ्रमण करताना काय फळ देतात, हे वेदमूर्ती ज्योतिषाचार्य अनंत पांडव यांनी eSakal.com च्या वाचकांसाठी खास सांगितले आहे.

मेष लग्न असताना शनि तुमच्या दशमातून जाणार आहे. प्रसिध्दीला ग्रहण लागेल. नोकरीत अधिकार सोडावा लागतो की काय अशी परिस्थिती येईल.

वृषभ लग्न असेल, तर शनि तुमच्या भाग्यातून जात आहे. दशमेश व्ययात जाण्याने नोकरीत उपद्रव घडेल, पण पैशाची चिंता असणार नाही. जास्त मानसिक त्रास होईल.

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

मिथुन लग्न असेल तर शनि अष्टमातून जात आहे. संकटे येणार आहेत. तयार राहा. पण आत्मविश्वास गमावू नका. यातूनही बाहेर पडणार आहात.

कर्क लग्न असेल, तर शनि सप्तमातून जाणार आहे. जोडीदाराशी जुळवून घ्या. जोडीदाराच्या घरच्या मंडळींचा जास्त त्रास होईल. इलाज नाही.

सिंह लग्न असेल, तर शनि षष्ठ स्थानातून जाणार आहे. एखादी कोर्ट केस असेल, तर बुध्दीचातुर्यावर ती जिंकाल. शनि सहाव्या स्थानी असताना शत्रू नांगी टाकतील. परिस्थितीवर नियंत्रण ठेवा. कारण अष्टमेश सहाव्या स्थानातून जाणार आहे. आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.

कन्या लग्न असताना शनि पंचम स्थानातून जाणार आहे. विद्यार्थी असाल, तर अभ्यास जास्त करा. मुले शिकत असतील, तर त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर लक्ष ठेवा.

तुम्ही एलआयसी पॉलिसी काढली असेल, तर आधी हे वाचा

तुळा लग्न असेल, तर शनि चतुर्थामधून जाणार आहे. सुखाला ग्रहण लागेल. वहाण त्रास देईल. घरात सुख रहाणार नाही. मातेशी पटणार नाही.

वृश्चिक लग्न असेल, तर शनि तृतीय स्थानातून जाणार आहे. भावंडांशी वाद होतील किंवा त्यांची काळजी करावी लागेल. लेखनाने अडचणीत येणार नाहीत ना, हे पहा.

धनू लग्न असताना शनि तुमच्या लग्न स्थानातून जाणार आहे. तुमच्या पर्सनालिटीत काही आश्चर्यकारक बदल होतील. तुम्ही बदलेले आहात, असे सर्व म्हणतील. डायरी लिहा आणि हे बदल नोंद करा. धनू राशीला हे बदल आश्चर्यकारक असतील.

मार्चमध्ये बँका राहणार आठ दिवस बंद, वाचा कोणते...

मकर लग्न असेल, तर शनि कुटुंब स्थानातून जाणार आहे. कौटुंबिक विवाद तुम्हाला जास्त त्रास देतील. मातेला मनवण्यासाठी खूपच प्रयत्न करावे लागतील.

कुंभ लग्न असताना शनि तुमच्या व्यय म्हणजे खर्चाच्या स्थानातून जाणार आहे. व्यावसायिक असाल, तर नुकसान संभवते. खर्च जोडीदारासाठीसुध्दा करावा लागेल.

मीन लग्न असताना शनि तुमच्या लाभातून जाणार आहे. मनाप्रमाणे अनेक गोष्टी पुढील अडीच वर्षात घडणार आहेत.

लातूरला कधी होणार चिकन महोत्सव

साडेसातीत काय करावे

आवश्यक तेवढे आणि कमीत कमी बोलावे. कुणाची निंदानालस्ती करू नये. कुणाहीबद्दल वाईट बोलू नये. कुठल्याही व्यसनाच्या आहारी न जाता आळस झटकून कामाला लागावे. घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा. शनी हा वृद्ध ग्रह आहे, त्यामुळे वृद्ध माणसांची सेवा करावी. कुणालाही गृहीत धरू नये. कुणाला जामीन राहू नये. सगळ्यात महत्वाचे म्हणजे अहंकारास तिलांजली द्यावी. असत्य भाषण करू नये. कुणाकडूनही पैसे उधार घेऊ नयेत. आपण मेहनत करावी आणि त्याचे शनी महाराज योग्य ते फळ दिल्याशिवाय राहणार नाहीत, हे पक्के ध्यानात ठेवावे.
- वेदमूर्ती ज्योतिषाचार्य अनंत पांडव

loading image