Sambhaji Nagar: मोसंबी बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल; शेकडो रिकाम्या हातांना मिळाला रोजगार

रोज सातशे टन आवक
Sambhaji Nagar
Sambhaji NagarSakal

पाचोड - तीन महिन्यापासून ओस पडलेली पाचोड येथील मोसंबी बाजारपेठ मोठ्या उमेदीने सुरु झाली आहे. सध्या रोज येथे सातशे ते आठशे टन मोसंबीची आवक होत असून यामुळे शेकडे रिकाम्या हातांना रोजगार मिळाला आहे. या बाजारपेठेत मोसंबीची कोट्यवधींची उलाढाल होत असून पर जिल्ह्यातून येथे मोसंबी विक्रीस येत आहे.

Sambhaji Nagar
Mumbai: भटक्या श्वानांचा 5 जणांना चावा; कल्याण पश्चिमेत भटक्या श्वानांची दहशत

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने धुळे -सोलापूर महामार्गा लगत येथे दहा वर्षांपूर्वी मोसंबीची बाजारपेठ सुरू करण्यात आली. या बाजारपेठेमुळे परराज्यासह परदेशात जाणाऱ्या मोसंबीला हक्काची स्थानिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

सध्या मृग बहारांची फळे उतरविण्याचा कालावधी असून चार महिने चालणारा हा हंगाम मजुरांसह व्यापाऱ्यांसाठी पर्वणी काळलच असल्याचे चित्र पाचोडसह पैठण तालुक्यात पाहावयास मिळते. तुर्तास फळे उतरविण्यास दोन महिन्याचा अवधी असला तरी फळगळती व पावसाने उघडीप दिल्याने बागायतदारांनी धास्ती घेत कच्ची हिरवी फळे तोडून विक्रीवर भर दिला आहे.

पैठण तालुक्यात साडेआठ हजार हेक्टरवर मोसंबीचे क्षेत्र लागवडीखाली आहे. तुर्तास मृग बहाराची फळे तोडण्याचे काम वेगात सुरू आहे. पाचोड येथील बाजार समितीच्या शासकीय जागेवर एकोणपन्नास नोंदणीकृत व्यापारी, आडत्यांची दुकाने असून येथे बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना व नगर जिल्ह्यातील मोसंबी विक्रीसाठी येत आहे.

Sambhaji Nagar
Pune: स्वस्तात दुचाकी देतो म्हणून पुणे जिल्ह्यातील शेकडो आशा सेविकांची करोडोंची फसवणूक; तक्रार करुनही कारवाई होईना...

येथील बाजारपेठेची व्याप्ती, मोसंबीची आवक पाहून दिल्ली, बंगळूर, हैदराबाद, अहमदाबाद, पुणे येथील व्यापारीही तळ ठोकून असतात. तुर्तास आंध्रपदेशमधील येणारी ''सातगुडी मोसंबी'' व दिल्ली येथे सुरु असलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील मोसंबीचे भाव कमालीचे घसरले आहे. सध्या मृग बहाराच्या फळांना १० हजारांपासून ते १४ हजार रुपये प्रति टनाप्रमाणे भाव मिळत आहे. शुक्रवार वगळता दररोज बाजारपेठेत "बोली" चे स्वर गुंजतात.

येथील मोसंबी बाजारपेठेत एक हजारापेक्षा अधिक मजूरांना रोजगार मिळाला आहे. एवढेच नव्हे तर मजूराप्रमाणेच शेकडो वाहनधारक, वजनकाटा चालकांनाही रोजगार मिळाला. येथे प्रतिदिवस सातशे ते आठशे टन मोसंबीची आवक होऊन आठ ते दहा कोटी रुपयांची उलाढाल होते.

यामुळे बाजार समितीलाही चांगले उत्पन्न मिळत आहे. या बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मोसंबीच्या शंभर ते १५० ट्रक्स बंगळूर, हैदराबाद, आग्रा, दिल्ली, मथुरा,अहमदाबाद, बनारस आदी ठिकाणी पाठविले जातात.

परराज्यातील मजुरांनी डेरा येथील बाजारपेठ, मोसंबीचे क्षेत्र व आवक लक्षात घेऊन मध्यप्रदेशातील सातशेवर मजुरांनी येथे आपला डेरा जमविला आहे.

Sambhaji Nagar
Mumbai: खासदार शिंदेंचे दुर्लक्ष?, कल्याण लोकसभा मतदार संघात भाजप नाराज

ते सकाळी दिवस उजाडल्यापासून ते रात्री दहा-अकरा वाजेपर्यंत मजूर झाडांवरील फळे उतरविण्यापासून फळांची ग्रेडिंग करणे, ट्रक्स भरून देणे आदी कामे करतात. तालुक्यात मोसंबी व्यवसायात पाच हजारावर मजुरवर्ग असून सर्वाधिक पसंती मध्यप्रदेशाच्या मजुरांना आहे.

स्थानिक बाजारपेठेमुळे मजूरांसह बागायतदारांची फरफट थांबून त्यांना रोजगार मिळाला. महाराष्ट्रासह परराज्यात येथून मोसंबी पाठविण्यात येते. बारमाही चालणारा हा व्यवसाय सर्वांसाठी पर्वणीकाळ आहे. तुर्तास फळगळती व पाणी टंचाईची धास्ती घेऊन बागायतदार झाडांवरील अपरिपक्व फळे तोडून बाजारपेठेत आणत आहे.

-राजू भुमरे (सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com