छत्रपती संभाजीनगर: बारावी परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा निकाल यंदा ८८.६८ टक्के लागला. निकालात विभागाने समाधानकारक कामगिरी केली असली; तरी मागील वर्षाच्या तुलनेत २.०९ टक्क्यांची घसरण चिंतेचा विषय ठरली आहे..विशेष म्हणजे, राज्यातील एकूण क्रमवारीत हा विभाग सातव्या स्थानावर घसरला असून कोकण विभागाने पहिला क्रमांक पटकावला आहे. मात्र, या सर्व घडामोडीत मुलींनी पुन्हा एकदा मुलांवर मात करत आपला दबदबा कायम राखला आहे..ग्राऊंड्समन बाप, फुल विकरणारी आई! IPL 2026 गाजवतोय मुलगा.छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या विभागातून एकूण १,८४,८४१ विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १,८२,६८८ (मुले १,०४,४९६ आणि मुली ७८१९२) विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यामधून १,६२,०२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये ८९ हजार ८९० मुले, तर ७२ हजार १३२ मुली आहेत. विभागाचा एकूण निकाल ८८.६८ टक्के लागला..त्यात मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८६.०२ टक्के, तर मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.२४ टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ६.२२ टक्क्यांनी अधिक आहे. मागील वर्षी विभागाचा निकाल ९१.८८ टक्के होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालात २.०९ टक्क्यांची घट झाली आहे. यामुळे राज्याच्या गुणवत्ता यादीत संभाजीनगर विभाग सातव्या क्रमांकावर फेकला गेला..Premium|Milind Shinde Journey : नामदेव ढसाळांची ती आर्द्र मिठी आणि 'झुलवा'च्या प्रयोगाचा तो थरारक अनुभव.गुणपडताळणीसाठी असा करा अर्जनिकालाबाबत काही शंका असल्यास ३ ते १७ मे दरम्यान गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी ॲानलाइन अर्ज करता येणार आहे. https://mahasscboard.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा, असे विभागीय मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे यांनी स्पष्ट केले..शाखानिहाय टक्केवारीविज्ञान : ९५.२९कला : ७५.४७वाणिज्य : ८३.९०व्यवसाय अभ्यासक्रम : ८३.५३आयटीआय : ८४.८३.जिल्हा परीक्षार्थी उत्तीर्ण टक्केवारीछ. संभाजीनगर ६३२५८ ५७४५२ ९०.८२बीड ४३६४३ ३९३४० ९०.१४परभणी २५५८४ २२४३७ ८७.६९जालना ३६००५ ३१०२८ ८६.१७हिंगोली १४१९८ ११७६५ ८२.८६एकूण १८२६८८ १६२०२२ ८८.६८.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.