

Chhatrapati Sambhajinagar Crime
esakal
Woman employee killed at petrol pump : (बाळासाहेब काळे ): छत्रपती संभाजीनगर–जालना महामार्गावरील करमाड येथील शिवसमर्थ पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरुणीचा भरदिवसा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. ९) दुपारी सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.