

Chh. Sambhajinager News
sakal
गल्लेबोरगाव (ता. खुलताबाद) : धुळे-सोलापूर महामार्गावरील खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी शिवारात महिलेने धावत्या एसटी बसमधून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता.२९) दुपारी घडली. कांताबाई मरमट (वय ३५, रा. हर्सुल सांवगी, ता. छत्रपती संभाजीनगर) असे तिचे नाव आहे.