Chhatrapati Sambhajinagar: संजय शिरसाटांच्या इगोचे पानिपत! पालकमंत्रिपदाच्या वर्षपूर्तीनंतर अवघ्या महिन्यात दुसरी हार, गटबाजीचा फटका, काय घडलं?

Impact of factionalism on Sanjay Shirsat politics: संजय शिरसाटांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह: गटबाजीचा फटका आणि दुसरी हार
Political Panipat for Sanjay Shirsat as Internal Rifts Lead to Defeat

Political Panipat for Sanjay Shirsat as Internal Rifts Lead to Defeat

Sakal

Updated on

-योगेश पायघन

छत्रपती संभाजीनगर: महाभारतातील ‘संजय’ हे पात्र अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कुरूक्षेत्रावर काय काय सुरू आहे, याचा ‘लाइव्ह’ वृत्तांत कौरवांच्या महालात बसून सविस्तर वर्णन करण्याची ‘दूरदृष्टी’ त्या ‘संजया’ला मिळाली होती. या दूरदृष्टीने समस्त सृष्टीला ‘महाभारत’ दाखविले. शिवसेनेचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत तशी दूरदृष्टी तर दाखवली नाहीच; उलट त्यांच्याच राजकीय ‘इगो’चे ‘पानिपत’ झाले आणि पक्षाला मतदारसंघातच पराभवाचे तोंड पाहावे लागले. कुटुंब, जवळच्या कार्यकर्त्यांमध्येच गुरफटलेल्या पालकमंत्र्यांकडून सामान्य कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याने महिनाभरात दुसरी हार पत्करावी लागली. त्यामुळे नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com