2NDA_Hindi
2NDA_Hindi

Admission : सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत प्रवेशासाठी २१ जानेवारीपर्यंत संधी

Published on

औरंगाबाद : संरक्षण दलांमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवकांना जास्तीत जास्त संख्येने जाता यावे, यासाठी औरंगाबाद येथे सैनिकी सेवापुर्व शिक्षण संस्थेची (एसपीआय) स्थापना केली आहे. या संस्थेत प्रवेश अर्ज स्विकारण्यासाठी २७ जानेवारी २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर लेखी परीक्षेचे हॉल तिकीट १० फेब्रुवारीनंतर संस्थेच्या संकेत स्थळावर प्राप्त होणार आहे. २०२१ करिता सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी आठ केंद्रावर १४ फेब्रुवारी २०२१ ला लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यानुसार परीक्षा केंद्र देण्यात येणार आहे.

जालना, बीड, परभणी, औरंगाबाद व हिंगोली या जिल्ह्यांसाठी औरंगाबाद परीक्षा केंद्र राहणार आहे. परीक्षेमध्ये एकाच प्रश्नपत्रिकेत १५० मार्काचे मल्टिप्लाय चॉईस प्रश्न असतील. त्यात ७५-७५ मार्कासाठी गणित आणि सामान्यज्ञानावर प्रश्न विचारण्यात येतील. लेखी परीक्षा साधारणता इयत्ता आठवी ते दहावीच्या स्टेट बोर्ड व सीबीएसईच्या आभ्यासक्रमावर अधारीत असेल. प्रत्येक योग्य उत्तराला एक गुण व प्रत्येक चुकीच्या उत्तरा ०.५ गुण वजा केले जातील. अधिक माहितीसाठी संस्थेच्या www.spiaurangabad.com या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



विद्यार्थी पात्रता
परीक्षा पात्रतेसाठी विद्यार्थ्याची जन्मतारीख २ जानेवारी २००४ ते एक जानेवारी २००७ च्या दरम्यान असावी, मार्च, एप्रिल, मे २०२१ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत परीक्षेला बसणारा असला पाहिजे. जून २०२१ मध्ये इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा. उंची १५७ सेंटिमीटर, वजन कमीतकमी ४३ किलो असावे. तसेच सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी पात्र असावा.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com