esakal | सातारा डोंगराला लागली दुसऱ्यांदा आग, दोन तासानंतर आटोक्यात

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

कुठल्याही डोंगराला आग लागु नयेत यासाठी वन विभागातर्फे जाळ रेखा ही यंत्रणेचा उपयोग घेण्यात येतो. मात्र सातारा डोंगराला एक महिन्यात दोन वेळा आग लागते.

सातारा डोंगराला लागली दुसऱ्यांदा आग, दोन तासानंतर आटोक्यात
sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : सातारा-देवळाई परिसरातील डोंगराला एका महिन्याच्या आत दुसऱ्यांदा आग लागली. गुरुवारी (ता.४) सातच्या सुमारास हा वणवा पेटला असून आग आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन बंब पाचारण करण्यात आले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास ही आग अटोक्यात लागली. गेल्या महिन्यातील दहा फेब्रुवारीला ही आग लागल्याची घटना घडली होती. मुळात वन विभागाने जाळ रेखा (आग लागू नयेत साठीची यंत्रणा) न आखल्यामुळेच सतत आग लागण्याच्या घटना घडत आहेत.

हेही वाचा - ग्रामीण भागातील शाळा २० मार्चपर्यंत बंद; १०वी व १२ वीच्या वर्गांना मात्र परवानगी


दरवर्षी सातारा उन्हाळा सुरू झाल्यानंतर सातारा डोंगरास आग लागते. यंदा तीन वेळा आग लागल्याचा प्रकार घडला आहे. एक महिन्यात दोन वेळेस आगीच्या घटना घडल्या आहेत. सातारा-देवळाई येथील एमएसईबीच्या सब स्टेशनहून सरळ जाणाऱ्या डोंगरावर ही आग लागली. माळरानवार काही अज्ञातांकडून आग लावण्याचे प्रकार होत असल्याचे वन विभागातर्फे सांगण्यात येत आहे. ही आग अटोक्यात आणण्यासाठी सातारा डोंगर निसर्ग सेवा फाऊंडेशने पुढे आले. त्यांच्यासह वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी ए.जी. तांबे, वन परिमंडळ अप्पासाहेब तागड, एसीएफ ए.जी पाटील ,रावसाहेब राठोड, घुसिंगे, सुदाम नरोडे यांनी पूढाकार घेतला.

हेही वाचा - Ease of Living Index 2020: देशात औरंगाबाद राहणीमान सुलभतेत ३४ तर जीवन गुणवत्तेत १३ व्या स्थानी


जाळ रेषांचा अभाव
कुठल्याही डोंगराला आग लागु नयेत यासाठी वन विभागातर्फे जाळ रेखा ही यंत्रणेचा उपयोग घेण्यात येतो. मात्र सातारा डोंगराला एक महिन्यात दोन वेळा आग लागते. त्यातही ती आटोक्यात आणण्यासाठी वन विभागाला शर्तीचे प्रयत्न करावे लागतात. यासाठी यंत्रणा असताना तीचा योग्य पध्दतीने वापर होताना दिसून येत नसल्याचेही आजच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहेत. एकीकडे जाळ रेषा साहित्य खरेदी केल्याचे सांगण्यात येत असले, तरी सातारा डोंगरात त्याचा उपयोग करताना मात्र विभाग दिसत नाही.

संपादन - गणेश पिटेकर