Aurangabad Crime : वाळूज परिसरात सात घरफोड्या, लाखोंचा ऐवज चोरला

सर्वजण नव वर्षाच्या स्वागताला लागलेले असल्याने चोरट्यांनी हा डाव साधला.
Aurangabad Crime
Aurangabad Crime esakal

वाळूज (जि.औरंगाबाद) : वाळूज परिसरात वडगाव (को) येथील गट क्रमांक पाच व गट क्रमांक आठमधील एकूण बंद असलेल्या सात घरांचे कडी, कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोने, चांदी असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. सर्वजण नववर्षाच्या स्वागताला लागलेले असल्याने चोरट्यांनी हा डाव साधला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून पोलीस गस्त घालण्याची मागणी करण्यात येत आहे. वाळूज (Waluj MIDC) औद्योगिक परिसरातील वडगाव (को.) गट क्रमांक 8 मधील प्लॉट क्रमांक 29 मधील समाधान यमाजी शिरसाट (वय 31) हे त्यांच्या वरच्या खोलीत झोपायला गेले होते. त्यामुळे बंद असलेले त्याचे घर फोडून दोन हजार रुपये रोख, एक ग्रॅमची अंगठी, चांदीचे पाच शिक्के, पाच भारचा कंबर पट्टा व दोन ग्रॅमची नथ तसेच त्यांच्या शेजारी राहणारे रावसाहेब यमाजी शिरसाठ (37) हे नेहमीप्रमाणे रात्री नऊ वाजता वरच्या मजल्यावरील रूममध्ये झोपायला गेले असता त्यांचेही खालच्या मजल्यावरील बंद घर अज्ञात चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून आतील ऐवज लंपास केला. (Seven House Robbery In Waluj Area Of Aurangabad)

Aurangabad Crime
Osmanabad Accident : उस्मानाबादेत मोठा अपघात, कारमधील चौघे जण जागीच ठार

सकाळी सात वाजता रेखा रावसाहेब शिरसाठ उठून खाली आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. यात दोन हजार रुपये कॅश, गहूमणी पोत, तीन ग्रॅम देवाची चांदीची मूर्ती. तसेच याच गट नंबर आठ मधील प्लॉट क्रमांक 40 मधील विकास सपकाळ हे गावी गेले होते. त्यांच्याही घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. कालिदास दीपाली गायकवाड (39) यांचेही गट नंबर 5 मधील प्लॉट क्रमांक 41, 42, 43 मधील घर फोडून रजिस्ट्रीसाठी ठेवलेले 50 हजार रुपये लंपास केले. ते शेतकामासाठी 27 डिसेंबर रोजी दरेगाव पाडळी (ता.खुलताबाद, जि.औरंगाबाद) (Aurangabad) येथे गेले होते. सिद्धार्थ दळवी (40) हे सुद्धा गट नंबर 5 मधील 45 नंबरच्या घरांमध्ये राहतात. ते लग्नाला सोलापूर (Solapur) येथे गेले होते. त्यांच्याही घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले. गट नंबर पाच प्लॉट क्रमांक 39 येथील किरण पांडुरंग (36) हे हस्ता (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) (Kannad) हे येथे गावी गेले होते. 25 डिसेंबर रोजी एकनाथ साळवे यांनी त्यांना फोन करून घर फुटल्याचे कळविले.

Aurangabad Crime
........आणि वैष्णवी महंत कार्यक्रम सोडून परतल्या

त्यांच्या घरातील पाच ग्रॅम कानातील झुंबर असा ऐवज लंपास करण्यात आला. या शिवाय प्रमोद जाधव (34) गट नंबर 5 रो हाऊस क्रमांक 3 यांना कंपनीत सुट्ट्या असल्याने ते डिलिव्हरीसाठी गेलेल्या पत्नीला बुल़डाणा येथे भेटण्यासाठी 29 डिसेंबर रोजी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी या सर्व घराचे कडी कोंडी तोडून आतील मुद्देमाल लंपास केला. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सचिन पागोटे, पोलीस अंमलदार संघराज दाभाडे, प्रकाश गायकवाड, एस.एन.भोटकर, रोहित चिंधले यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

गस्त घालण्याची मागणी

वाळूज औद्योगिक वसाहतीमुळे परिसरात कामगारांची संख्या मोठी आहे. या कामगारांना रात्री-बेरात्री घराबाहेर राहावे लागते. त्यामुळे अनेकांची घरे बंद असतात नेमकी हीच घरे शोधून चोरटे डल्ला मारतात. त्यामुळे या परिसरात रात्रीची गस्त घालावी अशी मागणी कामगार व नागरिकांमधून करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com