अब्दुल सत्तारांचे डावपेच यशस्वी, सोयगावच्या नगराध्यक्षपदी सेनेच्या तडवी | Soygaon Nagar Panchayat And Abdul Sattar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abdul Sattar And Chandrakant Khaire
अब्दुल सत्तारांनी मारली बाजी,सोयगावच्या नगराध्यक्षपदी सेनेच्या आशाबी तडवी

अब्दुल सत्तारांचे डावपेच यशस्वी, सोयगावच्या नगराध्यक्षपदी सेनेच्या तडवी

सोयगाव (जि.औरंगाबाद) : सोयगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदासाठी पिठासन अधिकारी संजीव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सभा पार पडली. यावेळी नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या आशाबी तडवी यांचा, तर उपनगराध्यक्ष पदासाठी सुरेखा काळे यांचे दोघांचे एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने सोयगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या (Shiv Sena) आशाबी तडवी, तर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्याच सुरेखा काळे यांची बिनविरोध निवड झाली. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदासाठी विरोधी एकही अर्ज प्राप्त न झाल्याने नगराध्यक्ष आशाबी तडवी आणि उपनगराध्यक्ष सुरेखा काळे यांच्या नावाची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पिठासन अधिकारी संजीव मोरे यांनी केली. (Shiv Sena Ashabi Tadavi Elected As President Of Soygaon Nagarpanchayat Abdul Sattar)

हेही वाचा: कोरोना काळात कुणी काय केलं, चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीला सवाल

यावेळी भाजपचे (BJP) दोन्ही सदस्य सभागृहात गैरहजर होते. सोयगाव नगरपंचायत निवडणुकीसोबत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी एकहाती बाजी मारल्याने राज्यात सोयगाव नगरपंचायत निवडणूक (Soygaon Nagarpanchayat Election) चर्चेचा विषय ठरली आहे. सोयगावात नगरपंचायत निवडणुकीत भाजपला सपाटून पराभवाचा दणका बसला आहे.

हेही वाचा: आईच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने हृदयविकाराने लेकीचा मृत्यू

शहराचा विकास महिलांच्या हाती

सोयगाव नगरपंचायत निवडणुकीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या दोन्ही महिलाच विराजमान झाल्या असून सभागृहात आठ महिला नगरसेविका राहणार असून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष या दोन्ही पदांवर शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी महिलांनाच बहुमान दिला आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत पिठासन अधिकारी संजीव मोरे, तहसीलदार रमेश जसवंत, मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी आदींनी कामकाज पाहिले. (Aurangabad)

Web Title: Shiv Sena Ashabi Tadavi Elected As President Of Soygaon Nagarpanchayat Abdul Sattar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top