Sanjay Raut : भाजप दोनशे पेक्षा जास्त जागा जिंकू शकणार नाही संजय राऊत यांचा दावा

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून, राज्यातील 48 पैकी 40 जागांवर सर्वांचे एकमत झाले आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
Sanjay Raut
Sanjay RautSakal

छत्रपती संभाजीनगर : भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन भाजपने कितीही प्रयत्न केले आणि चारशे पारचा नारा दिला तरी देखील भाजप लोकसभेच्या 200 जागांपेक्षा जास्त जागा जिंकू शकणार नाही, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मंगळवारी केला.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून, राज्यातील 48 पैकी 40 जागांवर सर्वांचे एकमत झाले आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी मंगळवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, एक अशोक चव्हाण काँग्रेस मधून गेले म्हणून काही फरक पडत नाही. दुसरे अनेक अशोक चव्हाण तयार होत असतात. चार दोन लोक गेल्यामुळे कोणताही पक्ष संपत नसतो. सध्या भाजप भ्रष्टाचारांना घेऊन चारशे जागा जिंकण्याचे स्वप्न बघत आहे,

परंतु त्यांनी असे कितीही प्रयत्न केले तरी भाजपला देशात 200 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असा दावाही राऊत यांनी यावेळी केला. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आमदार उदयसिंग राजपूत यांचीही उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com