
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे सरकारच्या विरोधात आंदोलन सुरूच असून, गुरुवारी (ता. १२) ‘क्या हुआ तेरा वादा?’ असा प्रश्न करत महावीर चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांनी रस्त्यावर ठिय्या मांडून वाहतूक ठप्प केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.