Shivsena : 'मशाल’नेच सेनेला औरंगाबादेत दिला होता पहिला खासदार

नव्या चिन्हाशी सेनेचे जुनेच नाते
Shivsena
Shivsena esakal
Updated on

औरंगाबाद : राज्यातील सत्तांतरानंतर खरी शिवसेना कोणाची? हा वाद सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडे गेला. उध्दव व शिंदे या दोन्ही गटांनी आमची शिवसेना खरी असा दावा केल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना नावाचा वापर करण्यास मज्जाव करत तात्पुरते चिन्ह गोठविण्याचा निर्णय दिला होता. आता निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव आणि ‘मशाल’ हे चिन्ह दिले आहे. हे ‘मशाल’ चिन्ह कधीकाळी शिवसेनेचे चिन्ह राहिले होते. याच चिन्हाने पहिला खासदार दिला. यामुळे शिवसेनेचे या चिन्हाशी जुने नाते आहे.

Shivsena
Shivsena New Logo: मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची नवं नाव आणि चिन्हावर प्रतिक्रिया

‘धनुष्यबाण’ गेल्यानंतर मिळालेले ‘मशाल’ हे कधीकाळी शिवसेनेचे चिन्ह होते. औरंगाबादेत याच मशालीने शिवसेनेला पहिला खासदार निवडून दिला होता. १९८९ मध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने मोरेश्वर सावे यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा त्यांची निशाणी ‘मशाल’च होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर तेव्हा ‘मशाल’ चिन्हावरच मते मागितली होती. लोकसभा निवडणुकीत याच चिन्हाने शिवसेनेच्या लोकसभेतील विजयाची द्वारे खुली केली होती.

Shivsena
Shivsena: "पहिल्याच प्रयत्नात उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंकले"

खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या विजयाची ‘मशाल’ तेव्हाच पेटली होती, याची आठवण या निमित्ताने होत आहे. या चिन्हावर लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर १९९८ चा अपवाद वगळता २०१९ पर्यंत औरंगाबाद लोकसभेवर शिवसेनेचाच भगवा कायम फडकत राहिला होता. १९९६ च्या निवडणुकीत ‘धनुष्यबाण’ चिन्हावर प्रदीप जैस्वाल खासदार झाले होते. त्यानंतर ९८ मध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करत कॉंग्रेसचे रामकृष्णबाबा पाटील हे विजयी झाले होते. या पराभवानंतर मात्र १९९९ ते २०१४ अशा सलग चार लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने विजय मिळवला होता. २०१९ मध्ये मात्र इथे आश्चर्यकारकरित्या एमआयएमने विजय मिळवला. त्यामुळे सर्वाधिक काळ धनुष्यबाण चिन्हासह लढलेल्या शिवसेनेसाठी म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी मशाल चिन्ह नवे नाही. या निमित्ताने पुन्हा एकदा उद्धव सेनेच्या हाती मशाल आली, असेच म्हणावे लागेल!

Shivsena
Shivsena : सेनेतील फूट, भाजप अधिक मजबूत; राष्ट्रवादीच्या नेत्याने टोचले कान

‘मशाल’ आमच्यासाठी ‘लकी’

चंद्रकांत खैरे (शिवसेना नेते) : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागणी केल्याप्रमाणे आम्हाला पक्षाचे चिन्ह व नाव मिळाले. निवडणूक आयोगाने दिलेली ‘मशाल’ ही अंधारातून प्रकाशाकडे नेणारी असून हे चिन्ह आम्हाला नवे नाही. यापूर्वीही औरंगाबादेत मोरेश्‍वर सावे यांनी तर मुंबईत छगन भुजबळ यांनी ‘मशाल’ चिन्हावर निवडणूक लढविली होती. आता पुन्हा एकदा ‘मशाल’ चिन्ह घेऊन आम्ही उभारी घेऊ.

Shivsena
Shivsena : हे नवं चिन्हच शिवसेनेत नवी क्रांती घडवेल; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

नावातच आमचा विजय

संदीपान भुमरे (रोहयो व फलोत्पादनमंत्री) : शिवसेना हा पक्ष नाही तर विचार आहे. हिंदुत्वाचा विचार जिवंत राहण्यासाठी रस्त्यावर उतरून लढणारी ही बाळासाहेबांचीच शिवसेना आहे. बाळासाहेबांची शिवसेना या नावातच आमचा विजय आजच निश्चित झाला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून बाळासाहेबांची शिवसेना असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालेले नाव योग्य आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला हे नाव देऊन न्याय दिला आहे. येत्या निवडणुकीत या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या नावाची काय ताकद आहे हे दाखवून देऊ.

Shivsena
Shivsena Symbol Freeze: धनुष्यबाण कोणालाच नाही!

बाळासाहेबांचे नाव मिळाल्याचा आनंद

राजेंद्र जंजाळ (जिल्हाप्रमुख शिंदे गट) : देशाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व शिकविले. अशा देशातील एका मोठ्या नेत्याचे म्हणजेच बाळासाहेबांचे नाव आमच्या पक्षाला मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे हिंदुत्व पुढे घेऊन जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com