

Mass Copying in 12th Exam: Centre Head Among 24 Accused
sakal
छत्रपती संभाजीनगर, देवगाव रंगारी: जैतापूर (ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान मास कॉपीचा मोठा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर कॉपीला खतपाणी घालणारे केंद्रसंचालक, पर्यवेक्षक आणि कर्मचाऱ्यांसह २४ जणांविरोधात मंगळवारी (ता.१०) देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात सहभागी ३२७ विद्यार्थ्यांची बोर्डाच्या त्रयस्थ समितीकडून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, या केंद्रावर शिक्षक आणि कर्मचारीच कॉप्या पुरवीत असल्याचे सीसीटीव्हीतून समोर आले आहे!