esakal | साठेबाजांमुळे शहरात तेलाचा तुटवडा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

औरंगाबादेत जालना, लातूर, श्रीरामपूर, धुळे, पुणे, जळगाव येथील तेल कंपन्यांतून आवक होते. या कंपन्यांमध्ये दोन दिवसांपासून तुटवडा जणवला. पंतप्रधानांनी केलेल्या भाषणानंतर ग्राहकांनी घाबरून मोठ्या प्रमाणावर खरेदी केली.

साठेबाजांमुळे शहरात तेलाचा तुटवडा

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आले आहेत. शहरात पॅकिंग तेलाचा तुटवडा जाणवत आहे, तर किराणा साहित्यातही गेल्या दोन दिवसांपासून पाच ते दहा टक्‍क्‍यांपर्यंत दरवाढ झाली आहे. तेलाच्या किमतीतही १० ते १५ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे, अशी माहिती तेलविक्रेते विनोद चौंडिये यांनी दिली. 

जीवनावश्यक वस्तू खरेदी नियमित सुरू राहील अशी सूचना दिल्यानंतरही गर्दी झाली होती. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पॅकिंगचे तेल बाजारपेठेत मिळत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या आहेत. त्यातही पॅकिंग तेलाचा तुटवडा जाणवत आहे. कंपनी आणि ट्रान्स्पोर्टचे कारण दाखवत कृत्रिम तुटवडा तयार करण्यात आला आहे. यामुळे तेलाच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

औरंगाबादेत जालना, लातूर, श्रीरामपूर, धुळे, पुणे, जळगाव येथील तेल कंपन्यांतून आवक होते. या कंपन्यांमध्ये दोन दिवसांपासून तुटवडा जणवला. पंतप्रधानांनी केलेल्या भाषणानंतर ग्राहकांनी घाबरून मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. याचा काही लोक गैरफायदाही घेत आहेत. यामुळे चढ्या दराने किराणा साहित्य व तेलाची विक्री करत आहेत. 
मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

करडी तेलाचे दर उतरले 

२०० ते २२० रुपये किलो विक्री होणारे करडीचे तेल आता ७० रुपयांनी स्वस्त झाले आहे. सध्या करडीचे तेल १५० रुपये किलोने विक्री होत आहे. नवीन करडी बाजारात आल्यामुळे करडी तेलाचे दर उतरले आहेत, असेही श्री. चौंडिये यांनी सांगितले. 

तेल दर  (रुपये किलो) 
सोयाबीन ९८ ते १०२ रुपये
सरकी   ९५ ते ९८ रुपये
पामतेल  ९० ते ९३ रुपये 
सूर्यफूल तेल  १०२ ते १०५ रुपये 
शेंगदाणा तेल   १२० रुपये किलो ​
करडी तेल १५० रुपये किलो 


लॉकडाऊनमध्ये तेलाच्या किमतीमध्ये १२ ते १५ रुपयांची वाढ झाली आहे. ती तेल कंपन्यांच्या माध्यमातूनच काही लोकांनी केली आहे. यामुळेच पॅकिंग तेलाचा तुटवडा जाणवत आहे. काही लोक साठेबाजी करण्यात करून चढ्या भावाने तेलाची विक्री करीत आहेत. यामुळेच हा तुटवडा जाणवत आहे. 
- विजय चौंडिये, बालाजी तेल भांडार, टीव्ही सेंटर 
--------------------- 

loading image