Chhatrapati Sambhajinagar: सिल्लोडमध्ये एक किलोमीटर वाहनांची रांग ;पंपावर पोलिस तैनात; तुटवड्याच्या अफवांमुळे वाहनधारकांकडून गरजेपेक्षा अधिकचा साठा

Long Vehicle Queues Outside Petrol Pumps in Sillod: ग्रामीण भागातील वाढती डिझेल मागणी, इंधन साठवण्याची घाई आणि कमी पुरवठा यामुळे कृत्रिम टंचाईचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांना कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पंपांवर तैनात राहावे लागत आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

सिल्लोड: तालुक्यातील पेट्रोल पंपांवर इंधन खरेदीसाठी तब्बल एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. शहर पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांनी पंपावर धाव घेत नागरिकांना रांगेत शिस्तीत इंधन घेण्याचे आवाहन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com