esakal | जिल्ह्यात सहा बँकांच्या शाखांचे इतर चार बँकांमध्ये विलीनीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

केद्र सरकारतर्फे १० बँकांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यास बँक कर्मचारी संघटनांनी विरोध केला; मात्र त्यांना यश आले नाही. यात ओरिएन्टल बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया या बँकांच्या शाखा पंजाब नॅशनल बँकेत तर आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँकेचे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन होणार आहे.

जिल्ह्यात सहा बँकांच्या शाखांचे इतर चार बँकांमध्ये विलीनीकरण

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : देशातील १० सरकारी बँकांचे एकत्रीकरण करून चार मोठ्या बँकांची निर्मिती करण्यात येत आहे. एक एप्रिलपासून याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात ओरिएन्टल बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक, अलाहाबाद बँक या सहा बँकांच्या जिल्ह्यातील १४ शाखा पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि इंडियन बँकेत विलीन झाल्या आहेत. विलीनीकरण झालेल्या शाखांवरील बँकांचे बोर्ड बदलले आहेत. लॉकडाउन संपल्यावर उर्वरित प्रक्रिया होणार असल्याचे लीड बँकचे व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनी सांगितले.

केद्र सरकारतर्फे १० बँकांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यास बँक कर्मचारी संघटनांनी विरोध केला; मात्र त्यांना यश आले नाही. यात ओरिएन्टल बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया या बँकांच्या शाखा पंजाब नॅशनल बँकेत तर आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँकेचे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन होणार आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सिंडिकेट बँक ही कॅनरा बँकेत, तर अलाहाबाद बँकेचे इंडियन बँकेत विलीन करण्याची प्रक्रीया सुरू आहे. कोरोनामुळे हे प्रक्रिया लांबणीवर पडेल असे वाटले होते; मात्र सरकारर्फे कोणत्याही परिस्थितीत ही विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. असेही कारेगावकर यांनी सांगितले.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

ग्राहकांना येणाऱ्या अडचणी
विलीनीकरण झाल्यानंतर ग्राहकांना नवीन अकाऊंट नंबर आणि कस्टमर आयडी मिळू शकतो. ज्या ग्राहकांना नवीन अकाऊंट किंवा IFSC कोड मिळेल, त्यांना ही माहिती इनकम टॅक्स डिपार्टमेंट, इन्शुरन्स कंपनी, म्युच्युअल फंड, नॅशनल पेन्शन स्कीम इत्यादी ठिकाणी अपडेट करावी लागेल. SIP किंवा लोनच्या EMI साठी ग्राहकांना नवीन इन्स्ट्रक्शन फॉर्म भरावा लागत आहेत. यामुळे ग्राहकांना अडचणी येणार आहेत.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

विलीनीकरणानंतर शाखांची झालेली वाढ

बँकेचे नाव शाखा संख्या विलीनीकरणानंतर वाढ  एकूण
पंजाब नॅशनल बँक  ९
युनियन बँक ऑफ इंडिया
कॅनरा बँक ११ १४
इंडियन बँक
loading image