मराठवाड्यातील दोन तरुणांनी जलबचतीची संकल्पना उतरविली प्रत्यक्षात

साधारणपणे तीन इंची लांबीचे नोझलप्रमाणे हे स्मार्ट सेव्हर उपकरण आहे. सध्या ते तीन वेगवेगळ्या साइजमध्ये आहे
water saver
water saverwater saver

औरंगाबाद: उन्हाळा सुरू झाला की ठिकठिकाणी पाणीटंचाई (Water scarcity) सुरू होते. मराठवाड्यासह देशातील अनेक शहरे, गावांना टंचाईची झळा सहन कराव्या लागतात. दुसरीकडे मोठ्या इमारती, हॉस्पिटल, कंपन्या, घरगुती वापरात नळाद्वारे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होते. ती कमी करण्यासाठी औरंगाबादेतील प्रणव भोगे, आकाश इंगोले या तरुणांनी बेसीन तसेच सर्व प्रकारच्या नळाद्वारे होणाऱ्या पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी ‘स्मार्ट सेव्हर’ तयार केले आहे (water smart saver). नळाच्या पुढील भागात ते लावल्यास तब्बल ८० ते ९५ टक्के पाण्याची बचत होते. त्यांच्या स्मार्ट सेव्हरला पेटंटही मिळाले आहे. अनेक कंपन्या, हॉस्पिटल, रहिवासी इमारती, घरगुती वापरात अनेक ठिकाणी या सेव्हरचा वापर होऊ लागला आहे.

कॉलेजमध्ये असताना शोध
प्रणव भोगे, आकाश इंगोले यांनी जेएनईसी अर्थात जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयात मॅकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. द्वितीय वर्षात असताना त्यांना वॉश बेसिनसह अनेक ठिकाणी पाण्याची नासाडी होताना दिसली. ती कमी कशी करता येईल यावर त्यांनी सुरवातील चर्चा केली. काय करता येईल यावर प्रत्यक्षात काम सुरू केले. त्यातून त्यांना स्मार्ट सेव्हर बनविण्याची संकल्पना सुचली. त्यावर आठ ते नऊ महिने अभ्यास केला. वॉटर मीटर बसवून रीडिंग घेतले. पारंपरिक नळाद्वारे येणाऱ्या पाण्याचे निरीक्षण केले. पुढे स्मार्ट सेव्हर साकारले. पारंपरिक नळ आणि स्मार्ट सेव्हर लावल्यानंतर येणाऱ्या पाण्याची तुलना केली आणि हा प्रयोग यशस्वी झाल्याचे कळले. त्यांच्या स्मार्ट सेव्हरला २०१८ मध्ये पेटंटही मिळाले. पेटंट मिळाल्यानंतर त्यांनी मिस्टोव टेक नावाची कंपनी स्थापन करून स्टार्टअप सुरू केले. या कंपनीतर्फे स्मार्ट सेव्हर उत्पादन होत आहे.

water saver
water saver

स्मार्ट सेव्हर असे काम करते
साधारणपणे तीन इंची लांबीचे नोझलप्रमाणे हे स्मार्ट सेव्हर उपकरण आहे. सध्या ते तीन वेगवेगळ्या साइजमध्ये आहे. बेसिन नळाच्या पुढील भागाला ते लावल्यानंतर एक प्रकारे पाण्याचा स्प्रे तयार होतो. उपकरणाच्या समोर असलेल्या छोट्या छिद्रातून तुषार वर्तुळाकाराने पसरत वेगाने हातावर पडतात. आवश्‍यक तेवढेच पाणी वापरले जाते, हात लवकर स्वच्छ होऊ शकतात, पाण्याची बचत होते.

water saver
Covid 19: तिसऱ्या लाटेच्या भीतीपेक्षा चिमुकल्यांची काळजी घेणे महत्त्वाचे

पाण्याची ८० टक्क्यांपेक्षा जास्त बचत
साधारणपणे मोठ्या इमारती, कंपन्या, हॉस्पिटल, कॉलेज, मंगल कार्यालयांत अनेक बेसिन असतात. घरगुती वापरासाठीही वॉश बेसिनला पसंती असते. यामध्ये इमारतीच्या उंचीनुसार नळाला प्रेशरने पाणी येते. केव बेसिनसाठी जेथे १५ ते ३० लिटर पाणी लागते तेथे स्मार्ट सेव्हरने फक्त दोन लिटर पाणी लागते. यातून ८० ते ९० टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत होते. आतापर्यंत तेथे स्मार्ट सेव्हर लावले तेथे आतापर्यंत ६० ते ६५ लाख लिटर पाण्याची बचत झाल्याचा दावा दोन तरुणांनी केला आहे. एकदा स्मार्ट सेव्हर लावले की त्याला कोणताही खर्च नाही. सेव्हरला सात वर्षांची वॉरंटीही आहे.

दोन खास वैशिष्ट्ये….
पाणी बचत व हात धुण्यासाठी कमी वेळ लागणे ही स्मार्ट सेव्हरची प्रमुख वैशिष्ट्ये आहे. नळाला हे उपकरण लावल्यानंतर कोणताही कृत्रिम दाब येत नाही असे मेकॅनिझम या उपकरणाचे आहे. औद्योगिक क्षेत्रासह वाणिज्यिक क्षेत्रात या उपकरणाची मोठी गरज आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांमध्ये याचा वापर सुरू करण्यात आला आहे. पाण्याची टंचाई असलेल्या शहरांत हे स्मार्ट सेव्हर उपयुक्त असल्याचे दोघे सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com