Covid 19: तिसऱ्या लाटेच्या भीतीपेक्षा चिमुकल्यांची काळजी घेणे महत्त्वाचे

दुसऱ्या लाटेत काही मुलांमध्ये जेनेटिक आजार ल्युकेमिया, आधीच व्याधी (को-मॉरबीड) असल्याने गंभीर केसेस समोर आल्या
covid 19
covid 19covid 19

औरंगाबाद: कोरोनाची दुसरी लाट संपण्याआधीच तिसऱ्या लाटेची धास्ती बालकांच्या कुटुंबीयांना पडत आहे. यामुळे ते काळजीत आहेत. परंतु, बालकांची व्यवस्थित काळजी घेतली तर त्यांचे कोविडपासून संरक्षण होईल. महत्त्वाचे म्हणजे बालकांच्या वर्तन, सवयी व निरीक्षणावरूनही कोविडच्या गंभीर लक्षणे पालकांना सहज लक्षात येतील. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत बालकांना कोविड झाल्याचे समोर आले. परंतु, ९५ टक्के मुलांमध्ये सौम्य लक्षणे होती. काहींमध्ये मात्र गंभीर लक्षणेही आढळून आली. पोस्ट कोविडनंतर मुलांच्या प्रकृतीला जास्त धोका दिसून आल्याचेही काही केसेसमध्ये दिसून आले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळणे हाच बालकांसाठी मोठा आधार आहे.

मुलांमध्ये हा आजार गंभीर होऊ शकतो का?
-९५ टक्के मुलांना सौम्य लक्षणे असतात. पाच टक्के मुलांना गंभीर आजार.
-गंभीर आजारात ९० च्या खाली ऑक्सिजन पातळी जाते.
-दम लागणे, दम पाडणे, शुद्ध हरपणे, रक्तदाब, रक्ताभिसरण कमी होणे.
-कधी-कधी फिट्स येणे या समस्या असतील तर तो गंभीर आजार आहे, हे समजायला हवे.
- या प्रकारात ऑक्सिजनची गरज असते. बालरोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार व्हेंटिलेटरचा उपयोग करता येतो.
-दुसऱ्या लाटेत काही मुलांमध्ये जेनेटिक आजार ल्युकेमिया, आधीच व्याधी (को-मॉरबीड) असल्याने गंभीर केसेस समोर आल्या.

वर्तन, निरीक्षणावरूनही कळतील गंभीर लक्षणे
वर्तन, निरीक्षणावरूनही कळतील गंभीर लक्षणे

लक्षणांतील फरक ओळखा
सामान्यतः मुलांमधील कोविडची लक्षणे सामान्य ‘फ्लू’ सारखी दिसतात. त्यामुळे संम्रभ होऊ शकतो. बालकांना दोन-तीन दिवस साधा ताप येणे, सर्दी, खोकला, मोठ्या मुलांचा घसा दुखणे, उलटी, पोट दुखणे, जुलाब लागणे ही लक्षणे आहेत. या सामान्य लक्षणांपेक्षा वेगळी लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांकडे जावे. आजार अंगावर काढू नये.

covid 19
Corona Updates: दिलासादायक! मराठवाड्यातील रुग्णसंख्येत मोठी घट

ही आहेत धोक्याची लक्षणे
-बाळाचा ताप तीन दिवसांपेक्षा जास्त तीव्र असणे.
-बाळ सुस्त असेल, सहा तासांपेक्षा जास्त लघवी न करणे.
-बाळ तोंडाने दूध न पिणे तसेच बाळ मलूल होणे.
-बेशुद्धावस्था, झटके येणे, अथवा अति झोपणे, दम लागणे.
-मोठा मुलगा असल्यास त्याला उलट्या अथवा जुलाब होणे.

एमआयए-सी सदृश आजाराची लक्षणे-
-पूर्वी कोविड झालेला असेल किंवा लक्षणे दिसून आलेली नसलेल्या मुलांना तीव्र ताप येणे.
- डोळे लाल होणे, तोंड, हात-पाय लाल होणे, अंगावर पुरळ येणे, पोट दुखणे.

covid 19
PHOTOS: महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी तुळजाभवानी देवीचे मंदिर

दुसऱ्या टप्प्यात तीन ते चार टक्के मुलांनाच गंभीर कोविडमुळे रुग्णालयात भरती करावे लागले. बाहेरून आल्यास घरातील व्यक्तीने हात-पाय धुणे, घरातील मोठ्या व्यक्तीने लसीकरण पूर्ण करायला हवे. त्यामुळे मुलांना संरक्षण प्राप्त होऊ शकते. गर्दीच्या ठिकाणी मुलांना नेणे टाळा. ताप आला तर घरी पॅरोसिटीमॉलपेक्षा जास्त काही देऊ नये. पाणी जास्त पाजणे व डॉक्टरांचा सल्ला घेणे.
-डॉ. रेणू बोराळकर, वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ, सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल, औरंगाबाद.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com